Thursday, March 28, 2024

काळाच्या ओघात हरवलं ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचं सौंदर्य, ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीचाही समावेश

जसा काळ बदलतो, तशा गोष्टीही बदलतात. आता बॉलिवूड अभिनेत्रींचंच घ्या ना. एकेकाळी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्रीचं सौंदर्य जणू गायबच झालंय. काहींना तर ओळखणेही कठीण झालंय. त्यांचे फोटो पाहिल्यानंतर आपल्याही मनात येतं की, अरे ही अभिनेत्री पूर्वी कशी होती आणि आता पाहा ती कशी दिसतेय, साहजिक आहे. काही अपवाद वगळले, तर एका काळानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल हा होतोच. मग त्यातच या अभिनेत्रीही आल्या. आपण अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना तुम्ही ओळखूही शकणार नाहीत.

मुमताज माधवानी
यादीत अव्वल क्रमांकावर आहे साठ आणि सत्तरचं दशक गाजवणारी अभिनेत्री मुमताज माधवानी. मुमताज आज ७४ वर्षांच्या आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये तब्बल १३९ सिनेमांमध्ये काम केलंय. पूर्वी रुपाची खाण असणाऱ्या मुमताज यांच्या चेहऱ्यावरील ते सौंदर्य आज हरपल्याचं दिसतंय.

पद्मिनी कोल्हापुरे
पुढची अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. पद्मिनी यांच्या सौंदर्यावर चाहते अक्षरश: फिदाच व्हायचे. त्यांच्या सिनेमासाठी प्रेक्षक वाटच बघायचे की, पद्मिनींचा सिनेमा कधी येतोय. आता पद्मिनी ५६ वर्षांच्या आहेत. काळानुसार त्यांच्याही सौंदर्यात बदल झाल्याचं दिसतंय. त्यांनी आतापर्यंत ७७ सिनेमांमध्ये काम केलंय.

झीनत अमान
तिसऱ्या क्रमांकावर आहेत अभिनेत्री झीनत अमान. झीनत यांनी आपल्या सौंदर्यासोबतच बोल्डनेसचाही जलवा दाखवला होता. त्या ७० च्या दशकातील सर्वात सेक्सी अभिनेत्री मानल्या जात होत्या आणि त्यांनी अनेक वर्षे बॉलिवूडवर राज्य केले होते. मात्र, तेव्हाच्या आणि आताच्या झीनत अमानमध्ये खूप बदल झाल्याचं दिसतंय. त्या आता ७० वर्षांच्या आहेत.

सायरा बानू
सायरा बानू या १९६३ ते १९६९ या काळात हिंदी सिनेसृष्टीतील तिसऱ्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक होत्या. तसेच १९७१ ते १९७६ या काळात त्या चौथ्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक होत्या. त्यांच्या सौंदर्यावर चाहते तर सोडाच खुद्द दिलीप कुमार फिदा झाले होते. आपल्या याच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या सायरा सध्या ७७ वर्षांच्या आहेत. त्यांचं सौंदर्य काळानुसार कमी झालंय.

अनु अग्रवाल
अनु अग्रवाल हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच नाही का? का नाही. ‘आशिकी’ सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल, तर तुम्ही हे नाव विसरूच शकत नाहीत. या सिनेमाने अफाट यश मिळवलं होतं. सिनेमासोबतच यातील कलाकारांनाही भलतीच प्रसिद्धी मिळाली होती. यातीलच अभिनेत्री आहे अनु अग्रवाल. सिनेमात आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी अनुला जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारणही तसंच आहे. एका अपघातानंतर अनुचे व्यक्तिमत्त्वही असं बनलं आहे, ज्यामुळं तिला सिनेमात अभिनेत्री तर दूरच, साधी आईची भूमिका मिळणेही कठीण झाले. कारण तिचे ग्लॅमर पूर्णपणे नाहीसे झाले आहे. तिच्या चेहऱ्यावर ती चमक आता राहिली नाही. तिचं वय ५२ वर्षे आहे.

अमृता सिंग
यादीतील शेवटचं नाव म्हणजे सैफ अली खानची पहिली पत्नी आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग. त्यांनी एकेकाळी आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं होतं. एकेकाळी आपल्या अभिनयानं ८० आणि ९०चं दशक गाजवलेल्या या अभिनेत्रीचं सौंदर्य आता कमी झालंय. त्यांचं वय ६३ वर्षे आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

एक- दोन लाखात खेळणाऱ्यातले नाहीत मांजरेकर, वाचा एका एपिसोडसाठी किती रुपये छापतात मराठी कलाकार

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता धर्म बदलून संसार थाटणारे कलाकार, १३ जणांच्या नावाने यादी फुल्ल

तब्बल ४० लाखांची कार, ५० लाखांचा डायमंड नेक्लेस, वाचा अंकिताला गिफ्टमध्ये काय काय मिळालेलं

हे देखील वाचा