Sunday, March 8, 2026
Home बॉलीवूड तेलगू चित्रपटांमध्ये महेश बाबूच्या नावाचे चालते नाणे, ‘या’ रिमेकने सलमानच्या करिअरला दिली नवी गती

तेलगू चित्रपटांमध्ये महेश बाबूच्या नावाचे चालते नाणे, ‘या’ रिमेकने सलमानच्या करिअरला दिली नवी गती

‘पुष्पा’ चित्रपट हिट झाल्यानंतर आता बॉलिवूडमध्येही दाक्षिणात्य स्टार्सची जोरदार चर्चा आहे. दक्षिण भारतातील असे अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांच्या हिट चित्रपटांचे रिमेक हिंदीमध्ये बनवले गेले आहेत आणि आता हिंदीच्या प्रेक्षकांनाही या स्टार्सबद्दल बरेच काही कळू लागले आहे किंवा जाणून घ्यायचे आहे. असाच एक तेलगू सुपरस्टार म्हणजे महेश बाबू होय. तेलुगू चित्रपटसृष्टीत महेश बाबूचे नाणे चांगलेच चालते.

प्रभास (Prabhas) किंवा अल्लू अर्जुन (Allu Arjun) सारख्या स्टार्सचा एखादा चित्रपट जरी मेगा हिट झाला तरी ते महेश बाबूसाठी (Mahesh Babu) आव्हान ठरल्याचं बोलले जाते. महेश बाबूच्या यशाचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, हिंदीसह देशातील अनेक भाषांमध्ये त्यांच्या चित्रपटांचे रिमेक बनवले गेले आहेत. परंतु महेश बाबूने इतर कोणत्याही भाषेतील हिट चित्रपटाच्या रिमेकमध्ये फारसे काम केले नाही. चला तर मग महेश बाबूच्या त्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊया ज्यांचा हिंदीत रिमेक झाला आहे.

वॉन्टेड

“एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं अपने आप की भी नहीं सुनता…” ‘वॉन्टेड’ चित्रपटातील भाईचा म्हणजेच सलमान खानचा हा हिट डायलॉग तुम्हाला आठवत असेल. याच चित्रपटाने सलमानच्या करिअरला पुन्हा एकदा नवी गती दिली. हा चित्रपट महेश बाबूचा सुपरहिट तेलगू चित्रपट ‘पोकिरी’चा रिमेक आहे. तेलुगूमधील ‘पोकिरी’ पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केला होता. तर हिंदीमध्ये ‘वॉन्टेड:चे ​​दिग्दर्शन प्रभुदेवाने केले होते. तेलुगूमध्ये इलियाना डिक्रूझची भूमिका आयशा टाकियाने हिंदीमध्ये केली होती. हा चित्रपट हिंदीशिवाय अनेक भाषांमध्येही बनला आहे.

तेवर

अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा अभिनित ‘तेवर’ हा चित्रपट देखील महेश बाबूच्या ‘ओक्कडू’ या हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ओक्कडू मध्ये महेश बाबूसोबत भूमिका चावला मुख्य भूमिकेत होती. ‘ओक्कडू’ हिट झाल्यानंतर २०१५ मध्ये ‘तेवर’ या शीर्षकासह हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला. अर्जुन कपूर महेश बाबूच्या भूमिकेत होता आणि सोनाक्षी सिन्हाने चावलाची भूमिका केली होती. तर ओबुल रेड्डी यांची तेलुगू चित्रपटात प्रकाश राज यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका मनोज बाजपेयी यांनी हिंदी रिमेकमध्ये साकारली होती.

महेश बाबू आणि समंथा अभिनित चित्रपट ‘डूकुडू’ २०११ मध्ये तेलगूमध्ये खूप हिट झाला होता. अनीस बज्मी या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याशिवाय महेश बाबूचे हिंदी डब केलेले सिनेमेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

हेही वाचा :

‘सगळे श्रेय माझे कपडे आणि हेअरस्टाइलला दिले’ म्हणत ‘रंगीला’ चित्रपटाबाबत उर्मिला मातोंडकरने केले स्फोटक विधान

जोडा अगदी शोभून दिसतोय! लग्नानंतर पहिल्यांदाच पतीसोबत स्पॉट झाली मौनी रॉय

बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य कलाकारांना घेऊन आहेत अनेक चुकीची मते, फॅमिली मॅन फेम प्रियामणीची खंत

 

हे देखील वाचा