×

खास निमित्तावर रोमॅंटिक होताना दिसले महेश बाबू अन् नम्रता शिरोडकर, लिपलॉक फोटो आला समोर

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या चित्रपटांमधील त्यांच्या उत्तम अभिनयामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र सध्या तो त्याच्या सोशल मीडियावरील एका फोटोमुळे चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये तो त्याची पत्नी नम्रता शिरोडकरला (Namrata Shirodkar) किस करताना दिसत आहेत. हा फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ…

महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर ही एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने २२ जानेवारीला तिचा ५०वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त तिला अनेकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या. याचबरोबर महेश बाबूनेही सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित, आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या. याचदरम्यान त्या दोघांचा एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघेही आपल्या घरात एकमेकांसोबत लिपलॉक करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत असून, या वयातही त्यांच्यामध्ये असलेली प्रेमळ केमिस्ट्री फोटोमध्ये झळकत आहे.

Photo Courtesy: Social media

दरम्यान नम्रता आणि महेश बाबू यांची पहिली भेट ‘वामसी’ या तेलुगू चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान झाली होती. हा महेश बाबूचा पहिलाच चित्रपट होता. याच चित्रपटादरम्यान त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं. याच मैत्रीच्या नात्याचं रुपांतर प्रेमात होऊन दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या वयात चार वर्षाचं अंतर आहे. १० फेब्रुवारी २००५ मध्ये दोघांनी लग्न केलं. त्यांना सितारा आणि गौतम नावाची दोन मुलं आहेत. लग्नानंतर नम्रताने चित्रपटांपासुन दूर जाण्याचा निर्णय घेतला.

तत्पूर्वी नम्रता शिरोडकर ही हिंदी चित्रपटक्षेत्रातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने सलमान खानसोबत ‘जब प्यार किसी सी होता है’ या चित्रपटातुन आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

हेही वाचा :

Latest Post