मराठी मनोरंजनविश्वातील खासकरून मालिका विश्वातील ओळखीचा चेहरा म्हणजे अभिज्ञा भावे. अभिज्ञाने तिच्या अभिनयाने आणि तिच्या व्यक्तिमत्वाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. अभिज्ञाने बहुतकरून नकारात्मक भूमिकाच जास्त साकारल्या, मात्र तरीही तिला मोठी फॅन फॉलोविंग आहे. नुकतीच तिची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका संपली. या मालिकेत तिने पुष्पवल्ली ही नकारात्मक भूमिका साकारली होती. मालिकेचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर लगेच अभिज्ञाने दुबई गाठत तिथे तिच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या. यावेळी तिने स्काय डायव्हिंग देखील केले. याबद्दल अभिज्ञाने एक पोस्ट शेअर करत तिचा अनुभव व्यक्त केला आहे.
अभिज्ञाने तिचा स्काय डायव्हिंग करतानाच एक फोटो शेअर करत तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “तुम्हाला माहीत आहे मी हे कधीच ठरवले नव्हते. अगदी माझ्या जीवनासारखे. मला हे करावेसे वाटले म्हणून मी केले. मी फक्त वाहत गेले. मी माझ्या खऱ्या आयुष्यातही तसेच करते. जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचे गणित मांडतो तेव्हा खूपच विचार करतो. खूपच बारीक आणि लहान गोष्टी गुगल केल्यामुळे नक्कीच त्याचे फायदे आणि तोटे समजतात मात्र त्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही. मी ही उडी मारण्याआधी भीतीपेक्षा जास्त स्वतःवर विश्वास ठेवला.”
View this post on Instagram
पुढे अभिज्ञाने लिहिले, “आयुष्यातील प्रत्येक आव्हानांप्रमाणे समोर जे येईल ते मला करायचे. असे मी स्वतःला सांगितले. यावेळी मला भीती वाटली आणि मी हे न करण्याचे ठरवले अगदी असेच मला माझ्या आयुष्यातील कठीण काळात देखील वाटले होते. मात्र एकदा तुम्ही या भीतीतून बाहेर पडलात की आजवर कधीच न जाणवलेल्या भावना, आनंद, आत्मविश्वास, कृतज्ञता सर्वच तुम्हाला जाणवायला लागते. तुम्हाला हे सर्व तेव्हाच जाणवते जेव्हा भीती मोठी वाटते, मात्र तुम्ही हार मानत नाही.”
पुढे ती लिहिते, “या उडीने मला हेच शिकवले की, जितकी मोठी भीती वाटेल, तितकाच मोठा आनंद तुम्ही जिंकल्यानंतर तुम्हाला जाणवेल. काही अनुभव तुम्हाला एक माणूस म्हणून संपूर्ण बदलावणारे असतात. माझ्यासाठी हा अनुभव तसाच होता. माझ्या डायव्हर मिशेलला खूप धन्यवाद. तो एक अनोळखी व्यक्ती होता ज्याच्या हातात माझा जीव होता. पण त्याच्या बदल्यात त्याने मला माझ्या आयुष्यातील एक उत्कृष्ट अनुभव दिला.”
अभिज्ञाने तिचा स्काय डायव्हिंगचा अनुभव खूपच चांगल्या आणि वाचनीय पद्धतीने लिहिला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतूक केले आहे. आता अभिज्ञा कोणत्या प्रोजेकटमध्ये दिसणार याकडे तिच्या फॅन्सचे लक्ष आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“पाकिस्तानमध्ये नाही तर भारतात मिळते प्रेम” पाकिस्तानमधील ‘या’ अभिनेत्रीने सांगितले सत्य
VIJAY VIKRAM SINGH: नैराश्याचा सामना, दारूचे व्यसन, गंभीर आजार आदी गोष्टींवर मात करत बनले ‘बिग बॉसचा आवाज’