Tuesday, July 9, 2024

‘हिंमत असेल तर खऱ्या नावाने कमेंट्स कर’, अश्लिल कमेंट्स करणाऱ्या युजरला वहिनीसाहेबांचा दणका

‘तुझ्यात जीव रंगला’ या सुप्रसिद्ध मालिकेतून अक्षया देवधर (पाठक वाई) आणि हार्दिक जोशी (राणा दा) यांना प्रचंड ओळख मिळाली. या कलाकारांसोबतच आणखी एक पात्र गाजलं ते म्हणजे वहिनीसाहेबांचं, अर्थातच धनश्री काडगावकर. प्रेक्षकांनी या पात्रालाही भरभरून प्रेम दिले. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. कारण काही दिवसांपुर्वीच ती आई बनली आहे. टीव्हीपासून लांब असली, तरी धनश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सतत आपले फोटो पोस्ट करून ती चाहत्यांशी संबंधित राहण्याचा प्रयत्न करते. मात्र नुकतीच अभिनेत्री भडकलेली पाहायला मिळाली. तिच्या चिडण्यामागे कारणही तसंच होतं.

वास्तविक अभिनेत्रीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये धनश्री योगसाधना करताना दिसली. यावर युजर्सने अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही जणांनी तिला स्वतः ची काळजी घ्यायला सांगितली, तर काही जणांनी बाळाची काळजी घेण्याचा सल्ला तिला दिला.

धनश्रीचे कौतुक करण्यासोबतच, काहींनी तिला ट्रोलही केले. ‘तू फुगा झालीयेस’, ‘तुझा फुटबॉल झालाय’ असे म्हणत काही युजर्सने तिची खिल्ली उडवली. मात्र हद्द तेव्हा पार झाली, जेव्हा एका युजरने अश्लील भाषा वापरत, चक्क तिच्या स्तनांवर कमेंट केली. यानंतर धनश्रीचा पारा चढला. तिला राग अनावर झाला आणि तिने त्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून, तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अपलोड केला.

Photo Courtesy : Instagram/kadgaonkar_dhanashri

इंस्टावर स्टोरी पोस्ट करत अभिनेत्रीने लिहले, “हे तुमचे संस्कार आहेत का? तुम्ही अशा प्रकारे एका स्त्रीसोबत बोलता? एखाद्या स्त्रीला अशी वागणूक देता? तुमच्यात इतकीही हिंमत नाहीये की तुम्ही तुमच्या खऱ्या नावाने इंस्टाग्राम अकाऊंट बनवून, त्यावरून कमेंट कराल.” इतकेच नव्हे, तर तिने चाहत्यांना त्या युजरच्या अकाऊंटविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन देखील केले. विशेष म्हणजे, तिला पाठिंबा देत युजर्सने अश्लिल बोलणाऱ्या युजरविरुद्ध तक्रारही केली. यासाठी धनश्रीने तिच्या चाहत्यांचे आभार मानले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भोजपुरी इंडस्ट्रीमधील सर्वात सुंदर अभिनेत्री मोनालिसाचे बिना मेकअप फोटो, साडीवर दिसतेय सौंदर्याची खाण

-हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरीच्या नवीन गाण्याची धमाल, मिळाले लाखो हिट्स

-प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावे

हे देखील वाचा