हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी कायमच आपल्या अदांनी, आपल्या नृत्यांनी चाहत्यांना वेडे करत असते. सपनाने खूप नाव कमावले आहे. तिच्या गाण्यांना, आणि नृत्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर प्रेम मिळत आहे. तिच्या गाण्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. कोरोना काळात तिला व्यासपीठावर कार्यक्रम सादर करता येत नाहीयेत. त्यामुळे एकामागून एक नवीन व्हिडिओमधून ती नेहमीसारखीच चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. अशातच पुन्हा एकदा ती एक नवीन गाणे घेऊन आली आहे.
सपनाची आवड तिच्या चाहत्यांमध्ये इतकी आहे की, तिचे कोणतेही नवीन गाणे हिट ठरते. अलीकडेच ‘डान्सिंग क्वीन’चे नवीन गाणे रिलीझ झाले आहे. ज्यामध्ये सपना नवीन स्टाईलमध्ये दिसली आहे. सपना चौधरीच्या ‘स्लेट बरती’या गाण्याने रिलीझ होताच धमाल केली आहे. हे गाणे झी म्युझिक हरियाणवी यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले आहे. या गाण्याला आतापर्यंत ४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात सपना वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली आहे.
या गाण्यात हरियाणवी गायक राज मावर सपनासोबत दिसला आहे. ‘स्लेट बरती’मध्ये सपना एका शाळेतील शिक्षिकेेची भूमिका साकारताना दिसली आहे. सपना चौधरीचे ‘स्लेट बराती’ हे रोमँटिक गाणे आहे.
या गाण्यात सपना शाळेतील मुलांना डान्स शिकवताना दिसत आहे. गायक मावरने या गाण्याला आवाजासोबतच म्युझिकही दिले आहे. या गाण्याचे लिरिक्स संजीत सारोहा यांनी लिहिले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-फिट अँड फाईन! सारा अन् जान्हवीने लुटला मालदीवचा आनंद; एकत्रच केला वर्कआऊट