‘आली ठुमकत…नार लचकत…!’ केसात गुलाबाचे फुल अन् नाकात नथ, गायत्री दातारच्या पारंपारिक अंदाजावर नेटकरी फिदा

tula pahate re fame gayatri datar shared her elegant photo in traditional look


सध्या लॉकडाउनच्या काळात सर्वचजण सोशल मीडियावर वेळ घालणे पसंत करतात. त्याप्रमाणे, अभिनेत्री गायत्री दातारही सोशल मीडियावर सक्रिय राहून, चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. फोटो असो वा व्हिडिओ, ती सतत काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अलिकडेच तिने आपला एक फोटो पोस्ट केला आहे. जो चाहत्यांना बराच भावला आहे.

गायत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे, जो पाहून कोणीही सहज तिच्या प्रेमात पडेल. गायत्री या फोटोमध्ये पारंपारिक अवतारात दिसली आहे. यात तिने लाल रंगाची नववारी साडी नेसून, जांभळ्या रंगाचे ब्लाउज घातले आहे. केसात गुलाब, कपाळावर चंद्रकोर आणि नाकात नथ एकंदरीत असा लूक करून अभिनेत्रीने अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष तिच्याकडे वेधून घेतले आहे.

या फोटोसोबतच फोटोखालील कॅप्शनही नेटकऱ्यांना विशेष भावले आहे. गायत्रीने हा सुंदर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, “आली ठुमकत…नार लचकत…!” फोटोवर कमेंट करून, चाहते तिचे सुंदर म्हणून कौतुक करत आहेत. एक युजरने कमेंट करत लिहिले की, “काहीही म्हण आपल्या महाराष्ट्रातल्या मुली साडीत एकदम झकास दिसतात.” फोटो शेअर करून काही तास झाले आहेत, तरी यावर आतापर्यंत ११ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

अलीकडेच गायत्रीने तिचा एक ब्लॅक ऍंड व्हाईट फोटो शेअर केला होता. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत होती. गालावर पडलेल्या खळीने तर कित्येकांचे हृदय चोरून नेले. हा फोटो देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. हा फोटो शेअर करून, गायत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “खळीला हिंदीमध्ये काय म्हणतात, तुम्हाला माहितीये का? मिळालं का? आता तेच गाणं दिवसभर तुमच्या डोक्यात राहील.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.