Monday, June 24, 2024

‘तुम बिन’ सिनेमातील ‘या’ हिरोने ज्या वेगात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यापेक्षा दुप्पट वेगात तो इथून झाला गायब

बॉलिवूड नेहमीच उगवत्या सूर्याला नमस्कार केला जातो. जो कलाकार लोकांच्या मागणीमध्ये सर्वात जास्त आहे त्याचा नेहमीच उदो उदो केला जातो, मात्र जो प्रेक्षकांकडून नाकारला जातो, तो हळूहळू इंडस्ट्रीमधूनच बाहेर पडतो. याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. असाच एक अभिनेता आहे, जो या इंडस्ट्रीमध्ये एकदम जोशात आला मात्र तो कधी इथून गायब झाला कोणाच्या लक्षातही आले नाही. तुम्हाला 2001 मध्ये आलेला ‘तुम बिन’ सिनेमा आठवतच असेल. त्यावर्षी अतिशय गाजलेला आणि हिट झालेल्या या सिनेमात हिमांशु मलिक नावाचा एक अभिनेता होता. हा अभिनेता नंतर कुठे दिसलाच नाही. कुठे गेला हिमांशु जाणून घेऊया.

राकेश बापट, प्रियांशु चटर्जी, संदली सिन्हा आणि हिमांशु मलिक यांचा ‘तुम बिन’ सिनेमा खूप गाजला. या सिनेमातील गाणी देखील अमाप गाजली. तुम बिन हिट झाल्यानंतर हिमांशु मलिक एका रात्रीत हिट झाला. मात्र, तो ज्या स्पीडमध्ये लोकप्रिय झाला त्यापेक्षा अधिक स्पीडने तो इंडस्ट्रीमधून गायब झाला. बॉलिवूडमध्ये हिमांशूने चांगली सुरुवात केली मात्र मधेच तो गायब झाला.

हिमांशूने एक मॉडेल म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. तो पहिल्यांदा सोनू निगमच्या ‘दिवाना’ अल्बममध्ये दिसला. त्यात तो खूपच हिट झाला. मात्र आता तर हिमांशुला ओळखणे देखील कठीण झाले आहे. हिमांशूने 1996 साली आलेल्या ‘काम सूत्रः द टेल ऑफ स्टोरी’ सिनेमातून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. त्याने मल्लिका शेरावतसोबत ‘ख्वाहिश’ सिनेमात काम केले. या सिनेमात त्याने 17 किसिंग सीन्स दिले होते. मात्र तरीही हा सिनेमा हिट झाला नाही.

हिमांशुने ‘एलओसी कारगिल’ ‘ख्वाहिश’ ‘रोग’ आणि ‘रेन’ आदी चित्रपट केले मात्र सर्व फ्लॉप झाले. त्यानंतर हळूहळू त्याला सिनेमे मिळणे कमी झाले आणि त बॉलिवूडमधून गायब झाला. पुढे त्याने निर्मितीमध्ये देखील नशीब आजमावले मात्र इथेही त्याला यश आले नाही. (tum bin actor himanshu malik here s how he looks now)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच आहे’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले बॉयकॉट ट्रेंडवर त्यांचे मत

शर्मिला यांचा हिंदी सिनेसृष्टीबद्दल माेठा दावा; म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चनसाठी खास स्क्रिप्ट…’

हे देखील वाचा