Thursday, March 28, 2024

शर्मिला यांचा हिंदी सिनेसृष्टीबद्दल माेठा दावा; म्हणाल्या, ‘अमिताभ बच्चनसाठी खास स्क्रिप्ट…’

बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान फिल्म इंडस्ट्रीबद्दल अनेक खुलासे केले आहेत. आपल्या काळातील फिल्म इंडस्ट्रीची आठवण करून देत शर्मिला यांनी त्यातील कमतरता सांगितल्या आहेत. शर्मिला यांनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचे वर्णन ‘थोडा जुने’ असे केले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शर्मिला टागोर (sharmila tagore) म्हणाल्या की, “हिंदी चित्रपटसृष्टी अजून थोडी जुनी आहे. कारण, शक्तिशाली भूमिका पुरुषांकडेच जातात. अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्यासारख्या अभिनेत्यांसाठी विशेष स्क्रिप्ट लिहिल्या जात आहेत, परंतु वहिदा रहमान आणि उर्वरित महिला कलाकारांसाठी विशेष स्क्रिप्ट लिहिल्या जात  नाही.” शर्मिला टागोर यांनी अभिनेत्री नीना गुप्ता यांचे कौतुक केले आणि त्यांचे वर्णन एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून केले.

शर्मिला टागोर पुढे म्हणाल्या की, “हॉलिवूडमध्ये जुन्या कलाकारांना चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी चांगला स्काेप मिळतो.  मात्र, बॉलीवूडमध्ये आमच्यासारख्या वृद्ध महिलांसाठी विशेष स्क्रिप्ट कधीच लिहिल्या गेल्या नाहीत. जसे नीना गुप्ता या चांगल्या अभिनेत्री आहेत आणि त्यांच्यासारखे अनेक हुशार आणि चांगले कलाकार आहेत, पण त्यांना काम करायला चांगला स्काेप मिळत नाही.” ओटीटी विषयी बाेलताना अभिनेत्री म्हणाल्या, “ओटीटी हे एक चांगले माध्यम आहे. त्याला थाेडा वेळ लागेल, पण खूप बदल होईल.”

शर्मिला टागोर यांनी दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले आहे. त्या राहुल व्ही चित्तेला यांच्या  फॅमिली ड्रामा ‘गुलमोहर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्री बत्रा कुटुंबातील कुलमाता कुसुमची भूमिका साकारणार आहे. या शोमध्ये अभिनेता मनोज बाजपेयी शर्मिला टागोर यांचा मुलगा अरुणच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गुलमोहर’ 3 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.(bollywood actre`s`s sharmila tagore says powerful roles go to men special scripts written for amitabh bachchan )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वात जास्त कमाई करणारा ‘वेड’ ठरला दुसरा मराठी चित्रपट

‘ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच आहे’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले बॉयकॉट ट्रेंडवर त्यांचे मत

हे देखील वाचा