Tuesday, January 20, 2026
Home बॉलीवूड तुषार कपूरचे फोटो पाहून फॅन्स तर फॅन्स कलाकारांनीही दिला त्याला, हमदर्दचे टॉनिक चालू करण्याचा पर्याय

तुषार कपूरचे फोटो पाहून फॅन्स तर फॅन्स कलाकारांनीही दिला त्याला, हमदर्दचे टॉनिक चालू करण्याचा पर्याय

बॉलिवूडमध्ये अनेक विनोदी अभिनेते आहेत. अनेक विनोदी चित्रपट देखील आहेत. पण यातील ‘गोलमाल’ या चित्रपटाच्या सीरिजने सर्वांचेच खास लक्ष वेधून घेतले. चित्रपटात फुल कॉमेडीचा तडका होता. प्रत्येक कलाकारांचे काम काहीतरी वेगळे आणि खास होते. यातीलच एक अभिनेता ज्याने तोंडातून एकही शब्द न काढता सगळ्यांना खळखळून हसवले होते, तो अभिनेता म्हणजे तुषार कपूर. तुषार कपूर हा अभिनयासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरून तो नेहमीच चर्चेत असतो. अशातच त्याने त्याचा एक शर्टलेस फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या फोटोवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत.

तुषार कपूरने इंस्टाग्रामवर त्याचे दोन फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कोणतेही कॅप्शन दिले नाही. त्याने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरी त्याच्या वयावरून त्याला ट्रोल करत आहे. अभिनेत्री सेलिना जेटली हिने देखील तुषारची मजा घेत या फोटोवर मजेशीर कमेंट केली आहे. तिने कमेंट केली आहे की, “हमदर्दचे टॉनिक चालू कर हा चांगला पर्याय आहे.” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “म्हातारा झाला आता तू,” यासोबत आणखी एकाने लिहिले आहे की, “आता म्हातारे झाले तुम्ही रामू काका.” (Tusshar Kapoor got troll on sharing shirtless pictures on social media)

https://www.instagram.com/p/CUT6vW8NXUy/

तुषार कपूरने त्याच्या करिअरची सुरुवात २००१ साली त्याच्या ‘मुझे कुछ केहना है’ या चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत करीना कपूर होती. या चित्रपटासाठी त्याला बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. यानंतर त्याने ‘क्या दिल ने कहा’, ‘ये दिल’, ‘जिना सिर्फ मेरे लिये’ आणि ‘कुछ तो है’ या चित्रपटात काम केले आहे. परंतु त्याचे हे सगळे चित्रपट फ्लॉप झाले होते.

एवढे सगळे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने २००४ मध्ये ‘गायब’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटसाठी त्याचे खूप कौतुक झाले. त्याच्या कामाची इंडस्ट्रीमध्ये चर्चा चालू झाली. यानंतर त्याने रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’ या चित्रपटात काम केले. त्याचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर झाला होता. चित्रपटाच्या पुढच्या दोन सिक्वेलमध्ये देखील त्याने काम केले. या नंतर त्याच्या करिअरचा आलेख उंचावत गेला.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रावर प्रश्न ऐकताच मीडियावर चिडली शिल्पा, म्हणाली ‘मी राज कुंद्रा आहे का?’

‘रेपिस्ट’ची प्रतिमा तयार झालेल्या रंजीत यांना लग्नासाठी मुलगी मिळणे झाले होते अवघड, मग…

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केलेल्या यश चोप्रा यांनी, शाहरुखसह अनेक कलाकारांना बनवले सुपरस्टार

हे देखील वाचा