Saturday, June 29, 2024

‘नातेवाईकच मुलींसोबत बला’त्कारासारखे घृणास्पद…’, हे काय बाेलून गेली उर्फी जावेद? व्हिडिओ एकदा पाहाच

टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्सबद्दल कायमच चर्चेत असते. महत्वाचे म्हणजे सामाजिक प्रश्न असो किंवा तिच्या कुटुंबातील अडचणी, उर्फी नेहमीच उघडपणे बोलण्यावर विश्वास ठेवते. अशात नुकतेच उर्फीने मुलींच्या सुरक्षेबाबत आपले मत मांडले असून आजूबाजूचे लोक आणि नातेवाईकच मुलींसोबत बला’त्कारासारखे घृणास्पद कृत्य करतात, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.

उर्फी (uorfi javed) हिने काही काळापूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्ट शोमध्ये भाग घेतला होता. यादरम्यान रणवीरने तिला विचारले की, ‘मुली आणि मुले वेगळ्या पद्धतीने वाढतात का?’ यावर अभिनेत्री म्हणाली, “होय..या मागे सुद्धा कारण आहे. ते असे की मुलींना प्रोटेक्ट करावे लागते जेणेकरून बाहेरील व्यक्ती काही करू नये. मात्र, हे विचित्र नाही का? की, आपल्या आजूबाजूचे लाेक किंवा नातेवाईक असे घृणास्पद कृत्य करतात आणि एखादी मुलगी जेव्हा तिच्या आईला सांगते की, या नातेवाईकाने तिच्याशी हे केले आहे, तेव्हा तिचे पालक तिला गप्प करतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Allahbadia (@beerbiceps)

उर्फीने पुढे असेही सांगितले की, ‘मला वाटते मुलींवर कंट्रोल ठेवणे सोपे आहे. हे अनादी काळापासून चालत आले आहे, विशेषत: पूर्वी लोक म्हणायचे की, माझ्या घरातील स्त्रिया आणि मुली माझ्या संमतीशिवाय घराबाहेर पडत नाहीत.

या शोमध्ये उर्फीने तिचे वैयक्तिक आयुष्य कसे गेले याबद्दल देखील खुलासा केला. खरे तर, उर्फीचे वडील तिला बेदम मारायचे. त्यामुळे ती वैतागली होती. तसे, अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील हा भयानक पैलू आधीच लोकांसोबत शेअर केला आहे. मात्र, आता अभिनेत्री तिचे आयुष्य बिंदास पण जगते. काही दिवसांपूर्वी उर्फी तिच्या आईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये दिसली होती, जिथून तिचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते. (tv acress uorfi javed on girls safety relatives and neighbours does rape of girls )

अधिक वाचा-
“…तर मी दोन मुलांची आई असते”, अभिनेत्री केतकी चितळेच मोठ वक्तव्य; एकदा वाचाच
जान्हवी कपूरने गाेल्डन ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फाेटाेशूट, एकदा पाहाच

हे देखील वाचा