Monday, May 20, 2024

‘उर्फी जावेदचा मेल वर्जन’, बाॅबी देओलचा ‘ताे’ व्हिजिओ व्हायरल, युजर्सने ट्राेल करत उडवली अभिनेत्याची खिल्ली

सनी देओलचा मुलगा करण देओलच्या लग्नानंतर संपूर्ण देओल कुटुंब चर्चेचा भाग बनले आहे. सनी देओलची पत्नी पूजा आणि बॉबी देओलची पत्नी तान्या यांच्याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचे आहे. देओल कुटुंबातील दोन्ही सुना मीडियात क्वचितच दिसतात. अशा परिस्थितीत करणच्या संगीतातील बॉबी देओल आणि तान्याचा डान्स पाहून सगळेच प्रभावित झाले हाेते. अशात हे क्यूट कपल बुधवारी (28 जुन)ला मुंबईत डिनरसाठी स्पॉट झाले होते, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

पत्नीसोबत डिनर डेटवर गेल्यावर बॉबी देओल (bobby deol) याचा लूक एकदमच वेगळा दिसत होता. अभिनेत्याने लूज रिप्ड जीन्स घातली असून सोबत काळी बनियान परिधान केली होती. अशात बॉबीची जीन्स थोडी जास्तच रिप्ड हाेती, जी लोकांना आवडली नाही आणि सोशल मीडियावर युजर्स अभिनेत्याला ट्राेल करू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

या सगळ्यात एका युजरने अभिनेत्याची खिल्ली उडवत कमेंट केले की, ‘कपडे अशा प्रकारे परिधान करा की, रेस्टॉरंट मालक तुम्हाला थेट डिश वॉशिंग एरियामध्ये घेऊन जाईल’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘उर्फी जावेदचा मेल वर्जन’, अशात एकाने तर चक्क कमेंट करत लिहिले की, ‘उंदराने सरांचे कपडे कुरतडले’

बॉबी देओलने पत्नी तान्यासोबत करण देओलच्या संगीतामध्ये ‘बरसात’ चित्रपटातील ‘हमको सिरफ तुमसे प्यार है’ या रोमँटिक गाण्यावर डान्स केला हाेता. दोघांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दोघे एकत्र खूप क्यूट दिसत होते. तान्याने पिवळा लेहेंगा घातला होता, तर बॉबीने पिवळ्या जॅकेटसह क्रीम रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता, ज्यात ताे खूप देखना दिसत असून चाहते त्यांच्या व्हिडिओवर प्रेमाचा वर्षाव करत हाेते.(bollywood actor bobby deol trolled for his clothes as he out for dinner with wife tanya deol users says chuha kutar gya sir ke kapde )

अधिक वाचा-
‘या’ कारणास्तव श्रेया घाेषालचे चाहते भडकले करण जाेहरवर; ट्राेल करत म्हणाले…
केवळ अभिनेत्रीच नाही, तर ‘हे’ कलाकारही ठरले आहेत कास्टिंग काउचचे बळी, ‘या’ अभिनेत्यांनी मांडली उघडपणे व्यथा

हे देखील वाचा