Thursday, March 30, 2023

तुनिषाच्या आत्म’हत्ये प्रकरणी माेठा खुलासा; चंदन के आनंद म्हणाला, ‘एक दिवस आधी…’

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्रीने तिचा शो ‘अलिबाबा दास्तान-ए-काबुल’च्या सेटवर मेकअप रूममध्ये आत्म’हत्या केली, ज्यानंतर सहकलाकार शीझान खानला अटक करण्यात आली. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अशात आता चंदन के आनंदने एक आश्चर्यकारक गोष्ट उघड केली आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान चंदन के आनंद (chandan k anand) याने सांगितले की, ‘तुनिषा डिप्रेस नव्हती. तिला आत्म’हत्येच्या एक दिवस आधी त्याला काहीतरी सांगायचे होते, पण वेळेअभावी तो तिच्याशी बोलू शकला नाही आणि दुसऱ्या दिवशी अभिनेत्रीने आत्म’हत्या केली.’ अभिनेता म्हणाला, ‘तुनिषाला माझ्याशी काही बोलायचे होते, पण वेळ न मिळाल्याने तिने दुसऱ्या दिवशी हे पाऊल उचलले. तिला काय बोलायचे होते हे मला माहीत नाही.’

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अभिनेत्री डिप्रेशनने त्रस्त असल्याचे बोलले जात होते. यावर शोमध्ये तुनिषाचे मामा बनलेले चंदन के आनंद म्हणाला, ‘लोक म्हणत आहेत की तुनिषा डिप्रेस होती, पण ते तसे नाही. जेव्हा लोक तिच्याबद्दल असे म्हणतात तेव्हा मला वाईट वाटते. ती काही डिप्रेशनमध्ये नव्हती, तिचे मन दुखले होते, वाईट वाटले होते आणि बाकी काय झाले ते फक्त तिलाच माहीत. मात्र, जेव्हा जेव्हा मी तिचा विचार करतो तेव्हा मला सेटवरच्या तिच्या मेहनतीची आठवण येते. ती आनंदी मुलगी होती, पण आता काय करायचं? काहीही करू शकत नाही.’

तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी वयाच्या 20 व्या वर्षी काेस्टार शीझान खानच्या मेकअप रूममध्ये आत्म’हत्या केली, ज्यानंतर अभिनेत्याला आत्म’हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तुनिषा शर्माच्या आईने आपल्या मुलीच्या मृत्यूचा आरोप शीजानवर केला होता, ज्यामुळे शीजन अजूनही तुरुंगात आहे.( tv actor chandan k anand talked about tunisha sharma death said she wanted to talk before suicide )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईन डे स्पेशल…सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, जाणून घ्या विश्वसुंदरी आणि अभिषेकची प्रेमकहाणी

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खुलले आर्चीचे सौंदर्य; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘याड लागलं’

हे देखील वाचा