Friday, June 13, 2025
Home टेलिव्हिजन दाढी-मिश्यांमध्ये देबीनाचा व्हिडिओ पोस्ट करणं गुरमीतला पडलं महागात, संतापलेल्या अभिनेत्रीने केलं ‘असं’ काही

दाढी-मिश्यांमध्ये देबीनाचा व्हिडिओ पोस्ट करणं गुरमीतला पडलं महागात, संतापलेल्या अभिनेत्रीने केलं ‘असं’ काही

टेलिव्हिजनवरील अनेक कलाकार सोशल मीडियावर आपल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. आपल्या चाहत्यांसोबत अनेक मजेशीर व्हिडिओ ते शेअर करत असतात. अनेकदा हे फोटो पाहून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केले जाते. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री देबीना बॅनर्जीच्या (Debina Bonnerjee) पतीने टाकलेल्या एका व्हिडिओमुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच फजिती झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे हा सगळा प्रकार चला जाणून घेऊ.

टीव्ही मालिकेतील राम सीता म्हणून प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे, देबीना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. दोघेही आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दोघांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. कधी कधी ते एकमेकांची चेष्टा करत असल्याचे दिसून येते. यावेळीही असाच काहीसा प्रकार देबीनासोबत घडला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

अभिनेता गुरमीत चौधरीने पत्नी देबीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. एका मजेशीर फिल्टरचा वापर करत हा व्हिडिओ शूट केला आहे, ज्यामुळे देबीनाला दाढी मिशी आल्याचे दिसत आहे. तिच्या संपूर्ण चेहर्‍यावर केस आल्याने खूपच विचित्र असा तिचा अवतार यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. फक्त चाहतेच नव्हे, तर अनेक कलाकारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मात्र इतका अपमान झाल्यावर गप्प बसेल ती देबीना कसली! गुरमीतच्या वागण्याने संतापलेल्या देबीनाने त्याला चांगली शिक्षा दिली आहे. सोबतच या शिक्षेचा व्हिडिओही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हात पाय बांधलेल्या अवस्थेत गुरमीत जमिनीवर पडला आहे, तर देबीना सोफ्यावर बसून त्याचा व्हिडिओ बनवत आहे. या मजेशीर व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

दरम्यान अभिनेता गुरमीत चौधरी सध्या आपल्या ‘दिल पे जख्म’ या गाण्याच्या व्हिडिओचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. यावेळी नेपाळमध्ये प्रमोशन करताना त्याला चाहत्यांनी गराडा घातला होता, त्याचाही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा