Thursday, June 12, 2025
Home टेलिव्हिजन बर्थडे सेलिब्रेशन! तेजस्वीनं चक्क आई- बाबांसमाेर करण कुंद्राला केलं किस, पाहा भन्नाट फाेटाे

बर्थडे सेलिब्रेशन! तेजस्वीनं चक्क आई- बाबांसमाेर करण कुंद्राला केलं किस, पाहा भन्नाट फाेटाे

अभिनेता आणि ‘बिग बॉस 15‘ फेम करण कुंद्रा आज 11 ऑक्टोबर रोजी त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्याचे चाहते आणि फॉलोअर्स त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहे. त्याचसाेबत प्रेमिका तेजस्वी प्रकाश हीने देखील करणला वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा दिल्या आणि त्याचबराेबर साेशल मीडियावर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक झलक ही चाहत्यानसाेबत शेअर केली आहे. ही पाेस्ट साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत असुन चाहते यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे. 

मंगळवार (दि. 11 ऑक्टाेबर)ला तेजस्वी (tejasswi prakash) हिने आपल्या साेशल मीडियावर  करण (karan kundrra) याच्या वाढदिवसाचे मध्यरात्रीचे वाढदिवसाचे फाेटाे शेअर केले. फाेटाेमध्ये तेजस्वी आणि करण यांनी काळ्या रंगाचा ट्विनिंग केले हाेते. या फाेटाेमध्ये त्या दाेघांचीही जाेडी खूप सुंदर दिसत आहे. फाटाेमध्ये तेजस्वीने बॉडी-हगिंग ऑफ-शोल्डर आउटफिट घातल आहे, तर करणने काळ्या रंगाचा टी – शर्ट आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejasswi Prakash (@tejasswiprakash)

फाेटाे शेअर करत तेजस्वीने दिले भन्नाट कॅप्शन
या फाेटाेमध्ये करण तेजस्वीसाेबत वाढदिवसाचा केक कट करताना दिसत आहे, तर दुसऱ्या फाेटाेत अभिनेता त्याच्या आई- वडिलाना मिठी मारताना दिसत आहे. तेजस्वीने इंस्टाग्रामवर वाढदिवसाचे फाेटाे शेअर केले, ज्यामध्ये अभिनेता भरभरुन एंजाॅय करत आहे. फाेटाे शेअर करत तेजस्वीने कॅप्शनमध्ये लिहिले, “हॅप्पी बर्थडे माय लव,माझी खुशी, माझी ताकद, माझी कमजाेरी, माझ मन, माझी शांती, माझ घर, माझी जग, फक्त आणि फक्त माझा, सनी.” यासाेबतच तिने हार्ट इमाेजीही टाकले आहे.

बिग बाॅसच्या घरात दाेघांची झाली भेट
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची पहिली भेट बिग बॉसच्या घरात झाली होती. बिग बॉसच्या घरात दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसत असतात. मीडियासमाेर दाेघेही कायम एकमेकांचा हात पकडत राेमॅंटिक पाेज देताना दिसतात.चाहते त्यांना प्रेमाने तेजरन म्हणतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाह!’बिग बाॅस’ फेम प्रिया मालिक अडकली लग्न बंधनात, नवऱ्यासाेबत एअरपाेर्टवर झाली स्पाॅट

प्रतिक्षा संपली! बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार दिसला दमदार भूमिकेत

हे देखील वाचा