Monday, July 1, 2024

मोहित रैना अन् अदिती शर्माच्या वैवाहिक आयुष्याला लागणार पुर्णविराम? अभिनेत्याने इंस्टावरुन हटवले फोटो

बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता मोहित रैनाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही चांगले चालले नसल्याचे बोलले जात आहे. मोहित रैनाचे वैवाहिक जीवन बर्‍याच दिवसांपासून अडचणीत आहे, त्यामुळे अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून पत्नी अदिती शर्मासोबतचे फोटो हटवले आहेत.

मोहित रैना (mohit raina) याने 2022 च्या सुरुवातीला आदिती शर्मा हिच्यासोबत लग्न केले होते. हे लग्न अगदी गुपचूपपणे पार पाडले, ज्याची कल्पनाही कुणाला नव्हती. लग्नाची फाेटाे शेअर करून त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली हाेती. मात्र, आता त्याच्या इन्स्टाग्रामवरून सर्व फाेटाे डिलीट करण्यात आली आहेत. इतकेच नाही, तर लग्नानंतरही अभिनेत्याने शेअर केलेले फोटो काढून टाकले आहेत, ज्यामुळे हे जोडपे वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, अद्याप या जोडप्याने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Raina (@merainna)

मोहित रैनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, “तो एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून अदितीला भेटला होता. त्यांच्यातील संबंध वाढवण्यासाठी मोहितने सर्वप्रथम पुढाकार घेतला. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Raina (@merainna)

माेहित रैना याच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. ‘देवों के देव महादेव’मध्ये त्यांने शिवची भूमिका साकारली होती. याशिवाय बंदिनी, चक्रवर्ती अशोक सम्राट  यातही काम केले आहे. टीव्हीनंतर माेहितने मोठ्या पडद्यावर काम केले. ‘मुंबई डायरीज 26/11’ या वेबसिरीजमध्येही तो दिसला होता. या वेबसिरीजला 2022साठी नॉमिनेट करण्यात आले होते. मोहित रैना शेवटचा डायना पेंटीसोबत ‘शिद्दत’ चित्रपटात दिसला होता.(tv actor mohit raina deleted pictures with wife aditi sharma from instagram)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लोकांकडे खायला अन्न नाही अन्…’, बेशरम रंग वादावर रत्न पाठकची संताप्त प्रतिक्रिया

‘कुण्या गावाचं आलं पाखरु’, जाणून घ्या सरगम कौशल विषयी

हे देखील वाचा