Tuesday, June 25, 2024

‘लोकांकडे खायला अन्न नाही अन्…’, बेशरम रंग वादावर रत्न पाठकची संताप्त प्रतिक्रिया

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित ‘पठान’ हा चित्रपट काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे. किंग खानचे चाहते मोठ्या पडद्यावर त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु हा चित्रपट अजूनही वादाच्या घेरात आहे. नुकतेच बेशरम रंग या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले होते. मात्र, हे गाणे समोर येताच ते वादात सापडले. अशात अनेक बॉलिवूड स्टार्सनी पठाणला पाठिंबा दिला आहे. प्रकाश राज, स्वर भास्कर यांनी सोशल मीडियावर दीपिका पदुकोण आणि चित्रपटाचे समर्थन करत आक्षेप घेणाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्याचवेळी आता अभिनेत्री रत्ना पाठक हिनेही चित्रपटाबाबतच्या या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्री रत्ना पाठक (ratna pathak) सध्या तिच्या पहिल्या गुजराती चित्रपट ‘कच्छ एक्सप्रेस’चे शूटिंग करत आहे, जो 6 जानेवारी रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबद्दल माध्यमाशी झालेल्या संभाषणात, जेव्हा अभिनेत्रीला ‘पठाण’ वादाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, “मला वाटते की, जर तुमच्या मनात सर्वात पहिले ही गाेष्टी येत असेल तर, आपण खूप मूर्ख काळात जगत आहोत. हा असा विषय नाही, ज्यावर मला अधिक बाेलायला आवडेल किंवा महत्त्व द्याला आवडेल. मला आशा आहे की, भारतात सध्या जे दिसत आहे त्यापेक्षा जास्त समजदार लोक आहेत. ते नक्कीच पुढे येतील, कारण हेच चालले आहे. भीतीदायक वातावरण, बहिष्कार करण्याची भीती हे कायम राहणार नाही.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आपल्या देशाकडे बघा, साथीच्या रोगाने छोटे व्यवसाय उद्ध्वस्त केले आहेत. नीट खायला अन्नही नाही आणि लोक काय परिधान करतात यावर आम्ही आमचा डाेक लावत आहोत.”

अभिनेत्री रत्ना पाठक हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘हम दाे हमारे दाे’, ‘खुबसूरत’, ‘थप्पड’, ‘धक धक’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे. (pathaan besharam rang bhagwa bikini controversy actress ratna pathak reacts and supports actress deepika padukone shah rukh khan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जीव माझा गुंतला’ मालिकेच्या सेटवर प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघात; म्हणाला, ‘…डोळा थोडक्यात बचावला’

पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट वनपीसमधील जान्हवीचा हटके लूक व्हायरल, पाहाच

हे देखील वाचा