Thursday, July 18, 2024

वादाच्या भोवऱ्यात राहिले डॉली बिंद्राचे आयुष्य, राधे माँवर केला होता लैंगिक शोषणाचा आरोप

वाद आणि हिंदी सिनेसृष्टी हे समीकरण काही नवीन नाही. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा वादांमुळेच जास्त चर्चेत असतात. या विवादीत अभिनेत्रींच्या यादीत पहिल्यांदा नाव घेतलं जातं ते म्हणजे डॉली बिंद्राच. वयाच्या १८ व्या वर्षापासून चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या डॉलीची कारकिर्द नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. आज गुरुवारी (२० जानेवारी) ती तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त पाहूया डॉलीच्या अशाच काही गाजलेल्या वादांबद्दल.

डॉलीचा जन्म डॉली २० जानेवारी १९७० रोजी मुंबई येथे झाला. बिंद्राने आपल्या चित्रपटक्षेत्रातील कारकिर्दीला अक्षय कुमारच्या ‘खिलाडियों के खिलाडी’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘बिच्छु,’ ‘खिलाडी ४२०’, ‘ गदर’ सारख्या लोकप्रिय चित्रपटात काम केले होते. मात्र आपल्या चित्रपटांपेक्षा ती कथित वादांमुळेच डॉली सतत चर्चेत राहिली. म्हणूनच डॉली म्हणजे वादाच दुसरं नाव असं समीकरणच त्या काळात तयार झालं होते. या वादांमुळेच तिला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली होती. ‘बिग बॉस ४’ मध्ये ती सहभागी झाली होती. ज्यामध्ये ती घरातील वादामुळे कायम चर्चेत होती. या कार्यक्रमात असा एकही स्पर्धक राहिला नव्हता ज्याच्यासोबत डॉलीचे खटके उडाले नसतील.

बिग बॉसच्या घरात असताना डॉलीचे सर्वात जास्त खटके श्वेता तिवारी, मनोज तिवारी आणि अश्मित पटेलसोबत उडाले होते. अश्मितवर तिने खासगी कमेंट केली होती. ज्यामुळे तिला बिगबॉसकडून सक्त ताकिद देण्यात आली होती. श्वेता तिवारीसोबतही तिने अनेकवेळा खालच्या पातळीवरील टिका केली होती. मात्र मनोज तिवारीसोबतची तिची किचनमधील भांडणे सगळ्यात जास्त चर्चेत राहिली.

डॉली बिंद्रा आणि राधेमाँ हा वाद त्यावेळी चांगलाच गाजला होता. डॉली बिंद्राने राधे माँवर लैंगिक शोषणाचा धक्कादायक आरोप केला होता. २०१५ मध्ये डॉलीने माध्यमांसमोर तिच्या एका नातेवाईकाकडे राधे माँने शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर तिने टल्ली बाबा नावाच्या एका व्यक्तिवरही लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

हा टल्ली बाबा राधे माँचा निकटवर्तीय असल्याच ही तिने सांगितले होते.
फक्त बिग बॉसच नव्हे, तर इतर ठिकाणीही ती अनेकवेळा वादांमुळे चर्चेत राहिली आहे. तिचा सोशल मीडियावरही एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. ज्यामध्ये डॉली आपल्या शेजाऱ्यांशी भांडताना दिसून आली होती. यावेळी शेजाऱ्यांनी तिच्यावर शिव्या दिल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा :

हे देखील वाचा