Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन केवळ राशीबेनच नाही, तर ‘या’ कलाकारांनीही यशाच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री

केवळ राशीबेनच नाही, तर ‘या’ कलाकारांनीही यशाच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रत्येक कलाकाराला अभिनय जगतात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. या मालिकांमधूनच हे कलाकार घराघरात पोहचतात आणि आपली नवीन ओळख निर्माण करत असतात. मात्र काही कलाकारांना त्यांच्या लग्नानंतर किंवा कौटुंबिक अडचणीमुळे यशाच्या शिखरावर असतानाच आश्चर्यकारक रित्या आपल्या  करिअरचा विचार सोडून घराकडे लक्ष द्यावे लागले. कोणते आहेत ते अभिनेते आणि अभिनेत्री चला जाणून घेऊ.

मोहना कुमारी
झी टीव्हीच्या डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातून स्पर्धक म्हणून आपला प्रवास सुरू करणारी रेवाची राजकुमारी मोहना कुमारीने अनेक शोमध्ये काम केले. ये रिश्ता क्या कहलाता है मधील कीर्तीच्या व्यक्तिरेखेने तिचे घराघरात नाव कोरले. यानंतर तिने उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांचा मुलगा सुयशशी लग्न केले आणि तिच्या अभिनय कारकिर्दीला अलविदा केला.

मिहिका वर्मा
‘ये है मोहब्बतें’ या टीव्ही शोमध्ये मिहिका वर्मा इशिताच्या लहान बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. 2016 मध्ये मिहिकाने एका एनआरआयशी लग्न केले आणि त्यानंतर ती अमेरिकेत शिफ्ट झाली. आता ती तिथे राहते आणि एका मुलाची आई आहे.

सौम्या सेठ
स्टार प्लसच्या नवीन शोमध्ये शाहीर शेखसोबत दिसलेली सौम्या सेठ हिचाही या यादीत समावेश आहे. ती शेवटची चक्रवर्ती अशोक सम्राटमध्ये दिसली होती. 2017 मध्ये अरुण कपूरसोबत लग्न केल्यानंतर तिने इंडस्ट्रीला अलविदा केला होता. मात्र, आता ती आपल्या पतीपासून विभक्त होऊन आपल्या मुलाचे संगोपन करत आहे.

संग्राम सिंग
‘ये है मोहब्बतें’मध्ये नायकाच्या भूमिकेत दिसलेल्या संग्राम सिंगने चार वर्षांपूर्वी अमृतसरमध्ये गुरुकिरणसोबत लग्न केले. लग्नानंतर त्याने अभिनय करिअर सोडले आणि पत्नीसह नॉर्वेला गेला. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगीही आहे.

अनस रशीद
दिया और बाती हममध्ये सूरज राठीची भूमिका साकारून घराघरात आपला ठसा उमटवणाऱ्या अनसने २०१७ मध्ये लग्न केले. या शोनंतर त्यांची लोकप्रियता खूप वाढली होती, पण लग्नानंतर त्यांनी इंडस्ट्री सोडली आणि कोणत्याही सीरियलमध्ये दिसला नाही. बातम्यांनुसार, आता तो त्याची एक वर्षाची मुलगी आणि पत्नीसोबत राहतो आणि शेतीची कामे करतो.

एकता कौल
स्टार प्लसचा कार्यक्रम मेरे अंगने मे मध्ये आपली छाप पाडणाऱ्या एकता कौलने अभिनेता सुमित व्याससोबत लग्न केले होते. लग्नानंतर तिने करिअर सोडून कुटुंबाची निवड केली आता ती एका मुलाची आई आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हेही वाचा-

हे देखील वाचा