×

शाहरुख खान का लपवतोय कॅमेऱ्यापासून चेहरा? समोर आले खरे कारण

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान (Shahrukh Khan) त्याच्या दिलखुलास व्यक्तिमत्वासाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि चित्रपटांनी त्याने सिनेजगतात सर्वात लोकप्रिय अभिनेता अशी ओळख मिळवली आहे. प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेला शाहरुख खान त्याच्या चाहत्यांसोबत नेहमीच फोटो काढताना, सेल्फी घेताना दिसत असतो. यासाठी तो कधीच त्याच्या प्रसिद्धीचा लोकप्रियतेचा बडेजाव करताना दिसत नाही. मात्र अलिकडे शाहरुखच्या एका कृतीने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. ते म्हणजे शाहरुख त्याच्या गाडीला पूर्णपणे काळे पडदे लावून गाडीतील काहीही दिसणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

सध्या शाहरुख खान सगळीकडेच फिरताना त्याचा चेहरा दिसणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. गाडींमधून फिरताना तो बंद काळ्या काचा आणि पडद्याचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे चाहते आणि माध्यमे कोणीही त्याचा चेहरा पाहू शकत नाही किंवा फोटोही काढू शकत नाही. या गोष्टीने सध्या सर्वांचेच लक्ष वेधले असून, शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटातील त्याचा लूक लपवण्यासाठी हे करत असल्याची माहितीही समोर आली आहे. शाहरुख खान त्याच्या पुढच्या चित्रपटाचा लूक मीडियापासून लपवण्यासाठी अशा कारमध्ये जातो.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नुकतेच रणबीर-आलियाच्या लग्नाच्या पार्टीतही असेच काहीसे पाहायला मिळाले होते. विमानतळावरही त्यांनी छत्रीने तोंड झाकले होते. आता रविवारी, नेटफ्लिक्स ग्लोबल टीव्ही चीफ बेला बजारिया यांच्या वाढदिवसानिमित्त, करण जोहरने एक खास पार्टी दिली ज्यामध्ये शाहरुख खान पडद्याने झाकलेल्या कारमध्ये आला होता. दरम्यान शाहरुख खान चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

शाहरुख खान शेवटचा २०१८च्या ‘झिरो’ मध्ये कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत दिसला होता. आता शाहरुख खानकडे अनेक उत्तम चित्रपट आहेत. त्यात ‘पठाण’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय अटलीच्या चित्रपटात तो नयनतारासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव उघड करण्यात आलेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post