Monday, July 8, 2024

उर्फी जावेदने केली बोल्डनेसची मर्यादा पार; इनरविनाच परिधान केला ओपन हुडी ड्रेस, एकदा पाहाच

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त असलेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ या शोमधून अनेक स्पर्धकांना प्रसिद्धी मिळाली. याव्यतिरिक्त काही स्पर्धक असे आहेत, जे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही प्रसिद्धीच्या बाबतीत अजूनही आघाडीवरच आहेत. यापैकीच एक म्हणजे उर्फी जावेद होय. उर्फीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असलेली उर्फी नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेचा विषय ठरते. विशेष म्हणजे, ती पॅपराजींचीही आवडती बनली आहे. ती जिथे जाते, तिथे पॅपराजी तिचा फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी गर्दी करतात. दुसरीकडे उर्फीचा विचित्र लूक नेहमीच तिला चर्चेचा धनी बनवतो. अनेकदा तिची फॅशन समजण्याच्या पलीकडची असते, ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अशातच आता ती पुन्हा एकदा आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चाहत्यांना तिचा बोल्ड अवतार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फी इनरशिवाय ओपन हूडी जॅकेटमध्ये फोटोशूट करताना दिसत आहे. त्याचवेळी तिने त्याच जॅकेटचा मॅचिंग स्कर्ट घातला आहे. या फोटोशूटमध्ये उर्फी भलतीच हॉट दिसत आहे. यादरम्यान उर्फी कॅमेऱ्याकडे न पाहता खाली जमिनीकडे बघताना दिसत आहे. तिच्या या फोटोंना ५० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर चाहते त्यावर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. (TV Actress And Bigg Boss Ott Fame Contestant Urfi Javed Wear Front Open Hoodie Dress Without Top Photo Viral)

या फोटोंवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, “तुमची स्टाईल खूप शांत आहे. मला कळत नाहीये की, मी मोहित व्हावे की भ्रमित.” दुसरीकडे, आणखी एका युजरने लिहिले की, “आली परत आपल्या अंदाजात.” याशिवाय अनेक चाहते ‘हॉट’, ‘ब्युटीफुल’ अशा कमेंट्स करताना दिसत आहेत.

उर्फीच्या फोटोंमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही उर्फीचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर येताच व्हायरल झाला आहे.

उर्फीची कारकीर्द
नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद सुरुवातीच्या काळात मॉडेलिंग करत होती. २०१६ मध्ये उर्फीला ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टेलिव्हिजन मालिकेतून ब्रेक मिळाला. या मालिकेत तिने अवनी पंतची भूमिका साकारली होती. यानंतर तिला दुसऱ्या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ‘चंद्र नंदिनी’ या मालिकेत उर्फीने राजकुमारीची भूमिका साकारली होती. येथून तिला ओळख मिळाली. यानंतर ती ‘मेरी दुर्गा’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपनाह’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा