‘बिग बॉस 16‘मधून चर्चेच्या झाेत्यात आलेली अर्चना गौतम सध्या दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अशात अर्चनाने दुबईतून तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे, ज्यामध्ये ती ‘मार मार के मोर बना दूंगी’ बाेल्याचे दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये अर्चना गौतम (archana gautam) यूट्यूबर आणि व्हिडिओ क्रिएटर अहमद मारझो आलूकीसोबत बसलेली दिसत आहे. व्हिडिओमध्ये अर्चना तिचा प्रसिद्ध ‘बिग बॉस’ डायलॉग ‘मार मार के मोर बना दूंगी’ म्हणताना दिसली, ज्यानंतर अहमद मारझाेने त्याचा अर्थ विचारला. यावर अर्चनाने त्याला इंग्रजीत समजवाले आणि संपूर्ण लाइनला तिथल्या भाषेत कसे म्हणतात हे देखील सांगितले. अर्चना त्याला तिच्या लाईन पुन्हा सांगते, पण तितक्यात तो त्याचा फोन उचलतो आणि पळून जातो. अर्चना गौतमच्या या व्हिडिओने प्रेक्षकांना खूप हसवत असून चाहते यावर भन्नाट कमेंट करत आहेत.
View this post on Instagram
अर्चनाला अलीकडेच एका कार्यक्रमात आयकॉनिक परफॉर्मर ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला. अर्चना गौतमने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “बिग बॉस सोडल्यानंतरचा काळ खूप छान होता. मला मिळालेल्या सर्व प्रेम आणि कौतुकाबद्दल मी माझ्या चाहत्यांची ऋणी आहे. मी दुबईमध्ये सुट्टी घालवत आहे आणि ते जगातील माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.”
View this post on Instagram
शोमधून बाहेर आल्यानंतर अर्चना पुर्णपणे बदलली आहे. अर्चनाला पाहता, असे दिसते की, तिने ‘बिग बॉस 16’ सोडल्याबरोबर एक मेकओव्हर केला आहे, जो तिच्या पर्सनॅलिटीत आणखीनच भर घालत आहे.(tv actress archana gautam in dubai she saying marte marte mor bana dungi video)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अविनाश- विश्वजित यांचा हॉलिवूडमध्ये धुमाकूळ! ‘या’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केले एक अधुनिक वेडिंग साँग
‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूरने गुढी पाडवाच्या शुभेच्छा देत शेअर केले फाेटाे, एकादा पाहाच