‘सिया के राम’, ‘देवयानी’, ‘देवो के देव महादेव’ यांसारख्या मालिकांमधून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या बहिणीच्या निधनामुळे चर्चेत आहे. खरे तर, काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीची बहिण म्हणजेच मधू मार्कंडेय हिचं निधन झालं, ज्यामुळे भाग्यश्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मधूचा संशयास्पद मृत्यू झाला असून घातपाताची शक्यता कुटुंबानी वर्तवली आहे. मधूच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. त्यामुळे या घटने प्रकरणी वाकड पोलिस अधिक तपास करत आहेत.
वाकड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीची बहिण मधू मार्कंडेय (madhu markandeya) ही केक बनवण्याचं काम करायची. व्यवसाय मोठा करण्याच्या उद्देशाने ती आणि तिची मैत्रीण रविवारी (दि. 12 मार्च)राेजी भाड्याने दुकान बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथे अचानक मधूला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे मैत्रीणीने तातडीनं खासगी रुग्णालयात मधूला दाखल केले, पण तिथुन मधूला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले.
मात्र, तिथे गेल्यानंतर मधूला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अशात आता या सगळ्या प्रकरणादरम्यान भाग्यश्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पाेस्ट शेअर केली आहे. या पाेस्टमध्ये अभिनेत्री म्हणाली, “सत्याचा विजय होईल”. मंडळी, आम्ही तुम्हाला सांगताे गेल्या महिण्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये मधूच्या पतीचं निधन झालं होतं. यादरम्यान भाग्यश्रीने फोटो पोस्ट करत माहिती दिली होती.
View this post on Instagram
याव्यतिरिक्त मधूच्या मामे भावाने तिचा घातपात झाला असल्याचे शंका वर्तवली आहे. ताे म्हणाला, “पंधरा दिवसांपूर्वी मधूच्या पतीचं निधन झाल असून ती दाेन मुलांसह पिंपरीतील राहाटणीत राहत होती. मधूसाेबत गेलेली मैत्रीण आम्हा काेणाला माहीत नाही. म्हणून आम्हाला तिच्या मृत्यूविषयी संशय आहे.” असे त्याचे म्हणणे आहे.(tv actress bhagyashree mote on her sister madhu markandeya death says trut shall prevail )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका
नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतिक्षित ‘घर बंदूक बिरयानी’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित