‘सिया के राम’ फेम अभिनेत्याने ठोकला चंदेरी दुनियेला रामराम; गावाकडं जाऊन करतोय शेती


छोट्या पडद्यावर ‘सिया के राम’ या मालिकेत श्रीरामाची भूमिका निभावणारा अभिनेता आशिष शर्मा. श्रीरामाची भूमिका साकारून तो घराघरात पोहोचला आहे. या शोमध्ये प्रेक्षकांचे देखील त्याला भरभरून प्रेम मिळाले होते. आता सध्या तो राजस्थानमधील त्याच्या गावी आहे. अशातच आशिषने त्याच्या चाहत्यांना हैराण करणारा एक निर्णय घेतला आहे. त्याने सांगितले की, तो अभिनयापासून दूर गेला आहे. अभिनयापासून दूर गेल्यानंतर त्याने आता शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘रंगरसिया’ आणि ‘सिया के राम’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला आशिष म्हणतो की, तो आता आयुष्यातील खरा आनंद अनुभवयाला शिकला आहे. तो आता पूर्णपणे शेतीवर लक्ष देत आहे. त्याने ई- टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोरोना काळात त्याने शेतीमध्ये लागवड केली आहे. गायीचे दूध काढले आहे तसेच त्याने ट्रॅक्टर देखील चालवला आहे. (Siya ke ram fame actor Ashish Sharma left acting and become farmer)

आशिष शर्माने त्याच्या मुलाखतीत सांगितले की, “मी आयुष्यातील खरा आनंद उपभोगायला विसरलो होतो. परंतु या महामारीने मला हे शिकवले आहे. मला या गोष्टीची जाणीव झाली आहे की, आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी आयुष्य आणखी सुंदर बनवतात. मी पुन्हा एकदा शेतकरी बनण्याचा निर्णय घेतला आहे. शेती करणे हा आमचा पारंपारिक व्यवसाय आहे. परंतु मुंबईला आल्यानंतर हे सगळं मागे राहून गेलं होतं. म्हणूनच मी पुन्हा येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.”

आशिषने पुढे सांगितले की, “गावामध्ये माझी 40 एकर जमीन आणि 40 गायी आहेत. मला लोकांमध्ये नैसर्गिक जीवन जगण्याची आवड निर्माण करून त्या प्रती लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची आहे. मला मदर नेचरच्या जवळ जायचे आहे.”

आशिषने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘रंगरसिया’, ‘रब से सोना इश्क’, ‘चंद्रगुप्त मौर्य’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.