Wednesday, October 9, 2024
Home टेलिव्हिजन घटस्फाेटित अन् जीवनसाथी गमावलेल्या लोकांना उद्देशून दलजीतने लिहिली नाेट; म्हणाली, ‘समाज तुमचे मन…’

घटस्फाेटित अन् जीवनसाथी गमावलेल्या लोकांना उद्देशून दलजीतने लिहिली नाेट; म्हणाली, ‘समाज तुमचे मन…’

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री दलजीत कौरने नुकतेच बिझनेसमन निखिल पटेलसोबत लग्न केले आहे. अभिनेत्रीचे हे दुसरे लग्न आहे. याआधी 2009 मध्ये दलजीतने शालीन भानोतसोबत लग्न केले, पण 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्रीने आता निखिल पटेलसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. लग्नानंतर तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. याद्वारे ती घटस्फोटित आणि जोडीदार गमावलेल्या लोकांना संदेश देताना दिसत आहे.

दलजीत कौर (dalljiet kaur) आणि निखिल यांचा विवाह 18 मार्च रोजी झाला. अशातच दलजीतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये लाल आणि पांढऱ्या लेहेंग्यात दिलजीत खूपच सुंदर दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंट आवाज येत आहे की, ‘आशा सोडू नका, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्याही ध्येयाच्या प्रेमात असाल, तर त्याला चिकटून राहा. ते ध्येय मनुष्य असू शकते किंवा एखादी इच्छा असू शकते. त्यामुळे त्याच्याशी जोडलेले राहा, चढ-उतार येतील, चांगले-वाईट काळही येतील. पण एक दिवस आशा पूर्ण होईल.

लग्नाचा हा व्हिडिओ शेअर करत दिलजीतने एक लांबलचक नोट लिहिली आहे. तिने लिहिले की, “उम्मीद म्हणजे आशा… स्वप्न पाहण्याची हिंमत असेल, तर ती पूर्णही करावी लागेल. जेव्हा जीवन तुम्हाला खाली खेचते आणि समाज तुमचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही असे करू नका याचे लाखो नकारात्मक कारणे असतात. फक्त हेच कारण आहे की, तुम्ही ते करायला पाहिजे.”

अभिनेत्रीने पुढे लिहिले आहे की, “तुमच्या आयुष्याविषयी इतर कोणालाही स्पष्टीकरण देऊ नका. तुमच्याकडे जगण्यासाठी फक्त एकच आयुष्य आहे, म्हणून तुमच्याकडे जे काही आहे ते जगा. तुमच्या मुलांना, कुटुंबाला आणि मित्रांना सांगा की, आनंदाची व्याख्या स्टिरियोटाइपद्वारे केली जात नाही. हे अनुभवांद्वारे परिभाषित केले जाते.”

दलजीतने ही नाेट घटस्फोट घेतलेल्या आणि आपला जीवनसाथी गमावलेल्या लोकांना उद्देशून लिहिलं, “मी सर्व घटस्फोटित आणि विधवा लोकांना सांगू इच्छिते की, आशा गमावू नका आणि तुमच्या सोबत्याचा शोध घेत राहा. कारण, कदाचित तुम्ही त्याला अजून भेटले नसाल. परिस्थिती पुन्हा वाईट होऊ शकते, परंतु हरकत नाही. घाबरण्यापेक्षा आयुष्यात पुढे जा. आयुष्याला संधी द्या. जीवनात आशा आणि आनंद असू द्या.”अशाप्रकारे दिलजीने आपले मत पाेस्टद्वारे मांडले आहे.(tv actress dalljiet kaur pens a motivational note for divorced and widowed people said keep looking for your soulmate)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सीता रामम’ फेम मृणाल ठाकूरने गुढी पाडवाच्या शुभेच्छा देत शेअर केले फाेटाे, एकादा पाहाच

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील ‘या प्रसिद्ध अभिनेत्याची पाहा कशी झाली अवस्था, वाचा काय आहे यामागे कारण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा