Saturday, April 20, 2024

देवोलीनाच्या लग्नाला भावाची नव्हती संमती? पाेस्ट शेअर करत म्हणाला, ‘नाते का यशस्वी होत नाही…’

टीव्ही इंडस्ट्रीतील गोपी बहू सध्या तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत आहे. गुपचूप कोर्ट मॅरेज केल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या नवऱ्याचे नाव आणि चेहरा उघड केला होता, ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सोशल मीडिया युजर्स देवोलिना भट्टाचार्जी हिच्या लग्नाला लव्ह-जिहादच्या अंतर्गत आणत आहेत आणि तिला श्रद्धा वाल्करच्या प्रकरणाशी जोडत आहेत, तर आता अभिनेत्रीचा भाऊ अंदीप भट्टाचार्जी यानेही तिच्या लग्नाबद्दल आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (devoleena bhattacharjee) हिने धर्माची भिंत तोडून जिम ट्रेनर शाहनवाज शेख (shahnawaz sheikh) याच्यासोबत लग्न केले आहे. अभिनेत्रीच्या लग्नाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहत्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करून आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान, देवोलीनाचा भाऊ अदिप भट्टाचार्जीचीही पाेस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की, तो आपल्या बहिणीच्या लग्नात पूर्णपणे आनंदी नाही. खरं तर, देवोलीनाच्या लग्नानंतर अंदीपने एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून लोक अंदाज लावत आहेत की, तो अभिनेत्रीवर रागावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Andeep Bhattacharjee (@mister_andeep)

अंदीपने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “सेल्फ ऑब्सेस्ड लोक या क्षणी त्यांना काय आवडते याचा विचार करतात. त्यांच्या मनात दुस-याबद्दल आदर किंवा सन्मान नसतो आणि मग त्यांचे नाते का यशस्वी होत नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते.” या पोस्टद्वारे देवोलीनाचा भाऊ आपल्या बहिणीला फटकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच अशी नाती यशस्वी होत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीना आणि शाहनवाज यांच्या लग्नावर बरीच टीका होत आहे. अभिनेत्रीला खूप ट्रोल केले जात आहे. ‘लव्ह जिहाद’वर भाषण देण्यासोबतच लोक तिची तुलना श्रद्धा वाल्करशीही करत आहेत.(tv actre`s`s devoleena bhattacharjee brother andeep reacted on sister marriage with shahnawaz sheikh says he is not happy)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेमात फसवणूक! डिप्रेशनमधून बाहेर आलेल्या अंजलीचा माेठा खुलासा; म्हणाली, ‘शहरात एकटी…’

लुटावं तरी किती? एक-दाेन हजार नव्हे, तर हिनाने बुटासाठी ‘एवढी’ माेठी मागितली रक्कम

हे देखील वाचा