Saturday, July 6, 2024

देवोलीनाने पती शाहनवाजसोबत शेअर केला खास फोटो, चाहत्यांनी केली राखी आणि आदीशी तुलना

आजकाल आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीझोतात असलेली लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आता त्यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. तिच्या पहिल्या महिन्याच्या वाढदिवसानिमित्त देवोलीनाने तिच्या पतीसोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले, जे तुफान व्हायरल होत आहेत. या खास प्रसंगी चाहते देवोलीनाचे अभिनंदन करत आहेत, तर काही युजर्स खूप विचित्र कमेंट्स करत तिला ट्रोल करत आहेत.

अलीकडेच देवोलीनाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती शाहनवाजसाेबत हातात हात टाकून केक कापताना दिसत आहे. देवोलीनाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्यासाठी आनंदाचा आणि हसणारा एक महिना, हा पुढचा प्रवास आणखी रोमांचक असेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलीनाने हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्स तिच्या फोटोवर विविध कमेंट करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले, ‘देवोलीनाला अशी काय मजबुरी होती?’ तर, दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘याच्या पेक्षा राखीचा आदिल बरा.’ अशात एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले की, ‘जोकर दिसताे तुझा नवरा’, तर एकाने कमेंट केली, ‘कृपया बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून येऊ नका, कारण तिथे तुमची किंमत राहणार नाही.’

देवोलीनाने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम हँडलवर तिचा मित्र विशालसोबतचा एक रील शेअर केला होता. यामध्ये ती शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर डान्स करताना दिसली होती. या व्हिडिओवरही लोकांनी तिला प्रचंड ट्रोल केले. देवोलीनाने गेल्या महिन्यात 2022 मध्ये शाहनवाजसोबत लग्न केले होते.(tv actress devoleena bhattacharjee celebrates first month anniversary with shahnawaz shaikh see users reaction)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हे’ 5 बाॅलिवूड स्टार्स 2023 मध्ये अडकणार लग्न बंधनात, कियारापासून अनेक बड्या कलाकारांचा यादीत समावेश

‘…तोच खरा मजनू’, सिद्धार्थ मल्होत्राच्या मिशन मजनू सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

हे देखील वाचा