Friday, April 19, 2024

लग्नानंतर देवोलिना विशाल सिंहसोबत दिसली रोमँटिक अंदाजात; युजर्स म्हणाले, ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’

देवोलिना भट्टाचार्जीने काही दिवसांपूर्वी तिचा प्रियकर शाहनवाज शेखसोबत लग्न केले. अशातच टीव्हीच्या ‘गोपी बहू’ने लग्नाच्या काही दिवसांनी विशाल सिंगसोबत रोमँटिक व्हिडिओ शूट करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. विशाल सिंग आणि देवोलिना भट्टाचार्जी ‘साथ निभाना साथिया’ शोचा भाग असल्यापासून एकमेकांना ओळखतात. तेव्हापासून दोघांमध्ये चांगले बॉन्डिंग आहे, पण लग्नानंतर अशा प्रकारे दुसऱ्या पुरुषासोबत रोमँटिक होण्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न युजर्स विचारत आहेत.

देवोलीना (devoleena bhattacharjee) आणि विशाल सिंग (vishal singh) यांच्या अफेअरच्या चर्चा यापूर्वीही सुरू होत्या. मात्र, ही अभिनेत्री असे काही करेल याची कल्पनाही कुणालाही नव्हती. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. एका युजरने कमेंट करत विचारले की, “या नात्याला काय म्हणतात.” तर दुसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले की, “भाऊ, आता सोडं, तिचे लग्न झाले आहे.” तिसरा युजरने कमेंट करत लिहिले, “जोडी तर ही आहे.” या व्हिडिओवर युजर्स अशाप्रकारे भन्नाट कमेटं करत आहे.

देवोलीनाने 14 डिसेंबर रोजी वयाच्या 37 व्या वर्षी शाहनवाज शेखसोबत लग्न केले. तिने इंस्टाग्रामवर प्री-वेडिंग समारंभांचे फोटो आणि व्हिडिओ देखील शेअर केले हाेते, जे तिच्या हळदी आणि मेहंदी समारंभाचे होते. माध्यमातील वृत्तानुसार, देवोलीनाने जवळपास 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शाहनवाजसोबत लग्न केले. शाहनवाज हा जिम ट्रेनर म्हणून काम करतो. तो अनेक सेलिब्रिटींना फिट राहण्यासाठी मदत करत आहे.(saath nibhaana saathiya star devoleena bhattacharjee romantic video with vishal singh after marriage with shahnawaz sheikh people asked yeh rishta kya kehlata hai)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विजय सेतुपतीपासून ते नयनतारापर्यंत हे साऊथ स्टार्स 2023 मध्ये बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण
पार्टीतला बाेल्ड लूक अन् हातात दारुचा ग्लास, अजयच्या लेकीचा सेलिब्रेशन व्हिडिओ पाहिलात का?

हे देखील वाचा