सुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार?…’


माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला आपल्या ‘ब्राह्मण’ विधानामुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. डाव्या विचारांच्या समर्थकांनी रैनाला बरेच खरे-खोटे सुनावले. मात्र यादरम्यान सुरेश रैनाच्या समर्थनार्थ अनेक कलाकार आणि त्याचे चाहते मैदानात उतरले आहेत. ट्विटरवर चाहते ‘में भी ब्राह्मण’ हॅशटॅगच्या माध्यमातून युजर्स खेळाडूला समर्थन देताना दिसत आहेत. या सर्वांच्या दरम्यान आता ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी देखील सुरेश रैनाच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.

 

देवोलीनाने दिला सुरेश रैनाला पाठिंबा

देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कोणत्याही विषयावर आपले मत देताना अजिबात घाबरत नाही. मुद्दा काहीही असो, गोपी बहुची भूमिका साकारणारी देवोलीना प्रत्येक विषयावर निर्भिडपणे आपले मत मांडते. अलीकडेच, सुरेश रैनाला पाठिंबा दर्शवत देवोलिना म्हणाली, “समस्या समाजात आहे, कारण जातीवाद समाजात आहे.” (sath nibhana saathiya actress devoleena bhattacharjee support suresh raina over i am brahmin remark)

युजरच्या ट्वीटवर या देवोलीनाने दिले प्रत्युत्तर
एका युजरने ट्वीट करून लिहिले होते की, “सुरेश रैना खूपच ट्रोल झाला होता. बरेच लोक त्याला भेदभाववादी म्हणत होते, कारण त्याने एका संभाषणात म्हटले की, ‘मला वाटते मी ब्राह्मण आहे.’ हे चुकीचे आहे का? हा गुन्हा आहे का? लोकांना याबद्दल वाईट का वाटत आहे?”

 

देवोलीनाने दिले असे उत्तर
हे ट्वीट पुन्हा ट्वीट करत देवोलिना म्हणाली, “समस्या समाजात आहे. जातिवाद समाजात आहे आणि खूप आहे. मला असे वाटते की, जे लोक याविरूद्ध बोलतात, कदाचित त्यांच्याच घरात जास्त असेल. दुखद आहे परंतु सत्य आहे. आपण हे थांबवू शकतो का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रोलिंगविरोधात कधी कडक कायदा होईल का?”

 

चाहतेही देत आहेत रैनाला पूर्णपणे पाठिंबा
देवोलीनाबरोबरच सुरेश रैनाचे चाहतेही त्याला पूर्ण पाठिंबा देत आहेत. सध्या ट्विटरवर ‘#में भी ब्राह्मण’ वेगवान ट्रेंड करत आहे. ज्यात मोठ्या संख्येने लोक रैनाच्या समर्थनार्थ दिसत आहेत. माजी क्रिकेटपटू कीर्ति आझादनेही रैनाच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
तामिळनाडू प्रीमियर लीगचे (TNPL) पाचवे सत्र सुरू आहे आणि पहिला सामना लिका कोवाई किंग्ज आणि सलेम स्पार्टन्स यांच्यात झाला. सिरीजच्या पहिल्या सामन्यादरम्यान सुरेश रैनाही सामील झाला होता. चेन्नई सुपर किंग्जच्या संघात २००८ पासून असलेल्या सुरेश रैनाला एका कमेंटेटरने विचारले की, त्याने दक्षिण भारतीय संस्कृती कशी स्वीकारली? यावर सुरेश रैना म्हणाला, “मला वाटतं, मी देखील ब्राह्मण आहे. मी २००४ पासून चेन्नईत खेळत आहे. मला इथली संस्कृती आवडते. मला माझ्या साथीदारांवर प्रेम आहे. मी अनिरुद्ध श्रीकांतबरोबरही खेळलो आहे. बद्री (सुब्रमण्यम बद्रीनाथ), बाला भाई (एल बालाजी) देखील आहेत. मला चेन्नईची संस्कृती खूप आवडते आणि सीएसकेचा भाग झाल्यामुळे मी स्वता:ला भाग्यवान समजतो.” त्याच्या याच वक्तव्याने सर्वत्र गोंधळ उडवला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

-वडिल सैफने केले दुर्लक्ष, मात्र तैमूरने पॅपराजींना दाखवला एखाद्या स्टारप्रमाणे स्वॅग!! पाहा व्हिडिओ

-धर्मेंद्र यांनी केले रणवीर सिंग अन् आलिया भट्टचे तोंडभरून कौतुक; आगामी काळात ‘या’ चित्रपटात दिसणार एकत्र


Leave A Reply

Your email address will not be published.