Monday, October 14, 2024
Home टेलिव्हिजन ‘प्रेग्नन्सीचं ड्रामा करते’, म्हणणाऱ्यांवर संतापली दीपिका कक्कर; व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

‘प्रेग्नन्सीचं ड्रामा करते’, म्हणणाऱ्यांवर संतापली दीपिका कक्कर; व्हिडिओ शेअर करत म्हणाली…

‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहेत. यादरम्यान सोशल मीडियावर दीपिकाला ज्या कमेंट येत आहेत, त्याबद्दल तिने तिच्या व्लॉगमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर काही लोक ती प्रेग्नंट नसून फक्त नाटक करत असल्याचं सांगत असल्यानं ही अभिनेत्री संतापली आहे. अशात रागाने चिडलेल्या दीपिकाने ट्रोलचा चांगलाच क्लास घेतला आहे.

दीपिका कक्कर (dipika kakar) हिने शोएबसाेबत (shoaib) लग्न केल्यापासून काही लोक तिच्यावर नाराज आहेत. कधी शोएबची दुसर लग्न केल्याबद्दल, तर कधी मुस्लिमाशी लग्न केल्याबद्दल युजर्स तिला ट्राेल करत असतात. अशा परिस्थितीत तिच्या प्रेग्नेंसीची बातमी त्यांना कशी पचणार होती. व्हीलॉगवर सतत येणाऱ्या निगेटिव्ह कमेंटमुळे अभिनेत्रीच्या पारा उडाला आहे. व्हीलॉगवर नकारात्मक बोलणाऱ्यांवर तिने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

व्हिडिओमध्ये दीपिकाने सांगितले की, “त्यांची पाचवी एॅनिवर्सरी होता, त्यामुळे लोकांनी शोएबबद्दल असभ्य कमेंट करायला सुरुवात केली आणि म्हणाले, ‘तुझा नवरा एनिवर्सरी दिन साजरा करत नाही? की, ताे तुला साेडून गेला.’, तर काही जण म्हणू लागले की, ‘त्यांचा घटस्फोटही लवकरच होणार आहे.’ काही लोक माझ्या भूतकाळाबद्दल कमेंट करत हाेते, ज्यांना माहित ही नाही मी काय भाेगले.”

दीपिकाने तिच्या व्लॉगमध्ये काही लोकांच्या कमेंट्स वाचल्या. पुढे ती म्हणाली, “शोएब माझ्या आयुष्याचा अभिमान आहे. मी माझ्या पतीची नक्कीच स्तुती करेन. माझा शोएबही माझ्यावर खूप प्रेम करतो. जे काही आहे ते आमच्यामध्ये आहे. आता तुम्हीही म्हणाल की बघा, ती अभिनय करायला आली आहे. होय भाऊ, आम्ही सर्व करतो. तुम्हाला काही अडचण असेल, तर आमच्याकडे पाहू नका. आम्ही असेच राहणार आहोत.” असे टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्करचे म्हणणे आहे. (tv actress dipika kakar got angry on trolls who says she is faking baby bump actress husband shoaib and second marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अक्षय कुमारने लेहेंगा परिधान करुन दिला लाईव्ह परफॉर्मन्स; युजर्स म्हणाले, ‘हे बघायचे बाकी…’

घटस्फोटानंतर पतीनं दुसरा संसार थाटला, पण सिंगल मदर बनून बॉलिवूडच्या या अभिनेत्री करतायेत मुलांचा सांभाळ, पाहा कोण कोण यादीत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा