Wednesday, July 3, 2024

दीपिकाने दिली गाेड बातमी; पाेस्ट शेअर करत म्हणाली, ‘अलहमदुलिल्लाह…’

अनेक दिवसांपासून टीव्हीवरील ‘सिमर’ म्हणजेच दीपिका काकर हिच्या प्रेग्नेंसीची सोशल मीडियावर चर्चा होत होती. मात्र, अभिनेत्रीने या बातम्यांवर आतापर्यंत मौन बाळगले होते. अभिनेत्री अन् तिचा पती शोएब इब्राहिम यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच आता दीपिका काकर आई होणार आहे याचा खुलासा स्वत: अभिनेत्रीने केला आहे. दीपिकाने तिचा पती शोएब इब्राहिमसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तिच्या प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

दीपिका (dipika kakar ibrahim) हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि शोएब पांढऱ्या कपड्यात ट्विनिंग करताना दिसत आहेत. अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून शोएब पांढऱ्या शर्ट-निळ्या डेनिममध्ये दिसत आहे. यासोबतच तिने टोपीही घातली आहे. दीपिकाने जी टोपी घातली आहे त्यावर ‘मॉम टू बी’ असे लिहिलेले आहे. तर शोएबच्या टोपीवर ‘डॅड टू बी’ असे लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

फोटो शेअर करताना दीपिकाने कॅप्शनमध्ये आई झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तिने लिहिले, ‘कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थतेने भरलेल्या अंत:करणाने मी तुम्हा सर्वांसोबत ही बातमी शेअर करत आहे की, हा आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे. होय, आम्ही आमच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहोत. लवकरच पेरेंटहुड हाेणार आहाेत. अलहमदुलिल्लाह, आमच्या बाळासाठी तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची गरज आहे. यासोबतच दीपिकाने #shoaika #parentstobe सारखे हॅशटॅग देखील वापरले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dipika (@ms.dipika)

या पोस्टवर कमेंट करत अनेक सेलिब्रिटींनी दीपिकाचे अभिनंदन केले आहे. सुष्मिता सेनची वहिनी आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिनेही दीपिकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, ‘अभिनंदन.’ यासोबतच तिने रेड हार्ट इमोजीही  टाकला आहे. यापूर्वी, दीपिका कक्करचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ती तिची मेहुणी सबा इब्राहिमचा वाढदिवस साजरा करताना दिसली होती. व्हिडीओ समोर आल्यानंतर तिचे पोट थोडे मोठे झालेले दिसत असल्याने चाहत्यांनी ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला हाेता. मात्र, या वृत्तांवर अभिनेत्रीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.( tv actress dipika kakar ibrahim shares pregnancy news with fan sima actress posts romantic photo with husband shoaib ibrahim )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आथिया अन् राहुल यांच्या लग्न सोहळ्यत पाहुण्यांसोमोर ठेवल्या ‘या’ अटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हॅपी संडे! श्रेया घोषालच्या हटके पाेज पाहिलात का?

हे देखील वाचा