गुरदीप कोहली (Gurdip Kohli) टेलिव्हिजन मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आपल्या कसदार अभिनयाने तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. आपल्या मालिकांइतकीच ती तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही सतत चर्चेत असते. रविवारी (३० जानेवारी) अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ तिच्याबद्दल काही खास गोष्टी…
मालिका क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात अशा खुप कमी अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या भूमिकेप्रमाणेच आपले दैनंदिन आयुष्यही आपल्या कुटुंबासमवेत मजेत घालवत असतात. मात्र याला अपवाद आहे, ती म्हणजे अभिनेत्री गुरदीप कोहली. कारण जितक्या सुंदर कौटुंबिक भूमिकांसाठी ती प्रसिध्द आहे, तितकीच तिची फॅमिलीसुद्धा प्रेमळ आहे.
‘कसम से’ या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याचबरोबर जी ५च्या ‘कहने को हमसफर है’ या मालिकेतील तिच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मालिकेतील तिने साकारलेल्या पूनमच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेत ती एका गृहिणीच्या भूमिकेत आहे. मात्र याच भूमिकेला शोभेल अशीच तिच्या कुटुबांची कथा आहे.
सोशल मीडियामधील पोस्ट मधील अनेकदा ती आपल्या सुखी कुटुंबाचे फोटो पोस्ट करत असते. गुरदीपने अर्जुन गुंजसोबत विवाह केला असून, त्यांना दोन मुलेही आहेत. आपल्या संपूर्ण कुटुंबाचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिची ही छोटी आणि सुंदर फॅमिली एखाद्या मालिकेतील कुटुंबाला शोभेल अशीच आहे. अनेक सणांचे आणि सुट्टीचे फोटो ती आपल्या सोशल मीडियावर नेहमी पोस्ट करत असते. तिचे चाहतेही तिच्या या फोटोंवर भरभरुन प्रतिक्रिया देत असतात. तिने ‘रावडी राठोड’ आणि ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातही काम केले आहे.
दरम्यान तिच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा :










