Saturday, June 29, 2024

देवोलीना भट्टाचार्जी आहे प्रेग्नेंट, म्हणूनच घाईघाईत केलं लग्न? अभिनेत्रीने तोडले मौन

अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने नुकतेच तिच्या लग्नाची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. एका खाजगी कार्यक्रमात अभिनेत्रीने तिचा प्रियकर शाहनवाज शेख याच्यासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर अभिनेत्रीला ट्राेल करणे सुरु झाले. काही लोकांनी देवाेलीनाची अभिनेत्री आलिया भट्टशी तुलना केली, ज्यात त्यांनी दावा केला की, तिने घाईघाईत लग्न केले कारण, ती गर्भवती आहे.

यावर देवाेलीनाने (devoleena bhattacharjee) सर्व ट्रोलला सडेतोड उत्तर दिले आहे. माध्यमाना दिलेल्या मुलाखतीत देवाेलीना यावर मोकळेपणाने बोलली. देवोलिना म्हणाली, “मला कोणालाच काहीही जस्टिफाई करण्याची गरज नाही, पण आजूबाजूला असे लोक आहेत ज्यांना वाटते की, मी प्रेग्नंट आहे आणि म्हणूनच मी अचानक लग्न केले. एखाद्याला त्रास देण्याची एकही संधी तुम्ही सोडू शकत नाही हा वेगळ्या पातळीवरचा दांभिकपणा आहे.”

तिचा मुद्दा पुढे करत देवोलिना म्हणाली, “ते कोणालाच आनंदी पाहू शकत नाही. हे कधीकधी निराशाजनक असते. कुणाला कुणाच्या आयुष्यात इतकं झोकून देण्याची गरज का आहे? पण नंतर मी या कमेंट्सवर हसले आणि सोडून दिले. मला खरंच माहित नाही की, पुढे काय होणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

तिच्या आयुष्याबद्दल पुढे बोलताना देवोलीनाने सांगितले की, “ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूप व्यस्त असली तरी ती पुन्हा कामावर येण्यासाठी तयार आहे.” ती पुढे म्हणते, “कामाच्या बाबतीत तडजोड करण्यावर माझा विश्वास नाही. मी कामावर परत जाण्यासाठी आणि नवीन प्रोजेक्ट्स हाती घेण्यासाठी तयार आहे. मला आशा आहे की, लवकरच काहीतरी मनोरंजक घडेल.”

रिऍलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी ती तयार आहे का असे विचारले असता ती म्हणाली, “मी चांगल्या प्रकल्पांसाठी तयार आहे, मग ते वास्तविक असो किंवा काल्पनिक. मी अजून बिग बॉससाठी तयार नाही, पण मला माहित नाही, माझ्या शब्दांवर जाऊ नका. ते घर माझ्यासाठी खास आहे. तर होय, मी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी खूप एक्साइटेड आहे.”

देवाेलीना भट्टाचार्जी विषयी बाेलायचे झाले, तर तिला ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.(tv actress is devoleena bhattacharjee pregnant that is why shey got married in a hurry the actress broke her silence)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वाढदिवस विशेष..! सुरांचे बादशाह मोहम्मद रफी यांनी ‘या’ कारणामुळे सोडलं होतं गाणं, कारणही गंभीर

किशोरदांच्या चित्रपटात रफीसाहेबांना गाणं गायला लावणारी शंकर-जयकिशन संगीतकार जोडी, का पडली नात्यात फूट?

हे देखील वाचा