Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेनिफर विंगेटने ब्लाउजशिवाय नेसली साडी, अभिनेत्रीच्या ‘किलर’ फोटोशूटने चाहते घायळ

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या बोल्डनेससाठीही ओळखली जाते. इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत जेनिफरचा समावेश होतो. जेनिफरने तिच्या अभिनय कारकिर्दीत नकारात्मक ते रोमँटिक अशी भूमिका साकारल्या आहेत. जेनिफर प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाईफबाबतही खूप चर्चेत असते. अभिनयासोबतच जेनिफर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अशातच जेनिफरने नवीनतम फोटोशूट शेअर केले आहे, जे साेशल मीडियावर चांगलेच वायरल हाेत आहे.

जेनिफर विंगेट (jennifer winget) हिने नुकतेच प्रसिद्ध फोटोग्राफर अमित खन्ना यांच्याकडून फोटोशूट करून घेतले. या फोटोशूटमधील जेनिफरचा लूक पाहून चाहते वेडे झाले आहेत. फाेटाेमध्ये जेनिफरने गडद हिरव्या रंगाची सिल्क साडी घातली आहे. मात्र, जेनिफरने या साडीसोबत ब्लाउज घातलेला नाही. अशात, ब्लाउजशिवाय नेसलेल्या या साडीच्या फोटोंमध्ये जेनिफर अत्यंत किलर पोज देताना दिसत आहे.

एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी जेनिफरने केले फाेटाेशटू
जेनिफरचा कमीत कमी मेकअप तिला आणखीनच सुंदर बनवत आहे. यासोबतच तिने केसात गजरा माळला आहे, जाे तिच्या साेंदर्यांत आणखीनच भर घालत आहे. जेनिफरने हे फोटोशूट एका मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केले आहे.

जेनिफच्या बाेल्ड फाेटाेंवर चाहत्यानी केला प्रेमाचा वर्षाव
जेनिफर विंगेटचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. त्याचबरोबर युजर्स जेनिफरच्या लूक आणि स्टाइलची कमेंट करून कौतुक करताना थकत नाहीत. जेनिफरच्या या फोटोंवर कमेंट करताना चाहते हॉट, बोल्ड, ब्युटीफुल अशा कमेंट करत तिचं कौतुक करताना दिसत आहेत. जेनिफरचे हे फाेटाे आत्तापर्यंत अनेकदा पाहिले गेले आहेत.(tv actress jennifer winget sizzles photoshoot in saree without blouse photos goes viral on social media )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनुपम खेर यांचा पाेहण्याचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल, पाेस्ट करत म्हणाले,’अडचणींपासून दूर पळणे…’

“आणखी किती वर्ष प्रेक्षकांना त्याच्या…” प्रवीण तरडे यांनी महाराष्ट्र्र शाहीर सिनेमाबद्दल केलेली ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

हे देखील वाचा