Tuesday, March 5, 2024

किरण खेरनंतर आता ‘ही’ अभिनेत्री सापडली कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करून दिली माहिती

भारतात पुन्हा एकदा कोरोनाची लाट झपाट्याने वाढत आहेत. गेल्या अनेक महिन्यांनंतर अचानक आता कोरोनाचे रुग्ण हजाराहून अधिक समोर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री किरण खेर कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या, ज्याची माहिती खुद्द किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे की, बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा भट्ट हिला देखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याची माहिती अभिनेत्रीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. यासोबतच तिने सोशल मीडियावर ट्विट करून लोकांना आवाहन केले की, जो कोणी तिच्या संपर्कात आला असेल त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी.

पूजा भट्ट (pooja bhatt) हिने तिचे ट्विटर अकाऊंट अपडेट केले असून, तिला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, ‘तीन वर्षांनंतर पहिल्यांदा मी पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे तुम्ही सर्व मास्क घाला. कोरोना अजूनही जवळपास आहे अन् संपूर्ण लसीकरण करूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आशा आहे की, मी लवकरच माझ्या पायावर उभी राहिण’.

पूजा भट्ट ही चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची मोठी मुलगी आहे. पूजा भट्टने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनेत्री शेवटची ‘चुप’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासाेबत सनी देओलसह अनेक स्टार्स दिसले होते. पूजा भट्ट सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मुक्तपणे मांडते.

अभिनेत्रीने आपल्या काराकिर्दमध्ये अनेक दमदार चित्रपटात काम कले आहे, ज्यामध्ये ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’,’चाहत’, ‘तमन्ना’, ‘डॅडी’ यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. (bollywood actress pooja bhatt tested covid 19 positive shared update on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हिंदुत्वाबद्दल केलेल्या ‘त्या’ ट्विटनंतर अटक केलेल्या अभिनेता चेतन कुमारला जामीन मंजूर

तामिळ सुपरस्टार अजित कुमारवर कोसळला दुःखाचा डोंगर, ‘या’ जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

हे देखील वाचा