टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा सतत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड आणि मादक अभिनेत्री म्हणून निया ओळखली जाते. मालिकांमध्ये अतिशय सध्या सोज्ज्वळ भूमिका करणारी निया तिच्या खऱ्या आयुष्यात मात्र कमालीची बोल्ड आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी निया सतत तिचे बोल्ड, अतिबोल्ड फोटो शेअर करत असते. नियाला तिच्या फोटोंवरून अनेकदा ट्रोल देखील केले गेले मात्र ती त्याकडे सर्रास दुर्लक्ष करते.
आता पुन्हा एकदा नियाने तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले असून, त्या फोटोंमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. नियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिम शॉट्स घातलेले काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती बसून पोज देताना दिसत असून, या ड्रेसवर तिने एक चेनसारखा दिसणारा नेकलेस देखील गळ्यात घातला आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये नियाने तिचे केस मोकळे सोडले असून, यात ती हॉट पोज देताना दिसत आहे.
या ड्रेसवर तिने घातलेले शूज देखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिचा न्यूड मेकअप आणि त्यावर तिने लावलेली लिपस्टिक तिच्या लुकला अधिकच सुंदर बनवत आहे. तिने शेअर केलेल्या सर्वच फोटोंमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत असून, तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज आणि लूक चांगलाच पसंत पडत आहे. तशा कमेंट्स तिला येत असून, फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या नियाला इंस्टाग्रामवर ७ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स असून, फॉलोवर्सच्या यादीत ती टॉपची सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते.
एक हजारो मैं मेरी बेहना है, जमाई राजा, नागीण, जमाई राजा २.० आदी अनेक मालिकांमध्ये काम केलेल्या नियाचे काही महिन्यांपूर्वीच ‘फूंक ले’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्याला देखील प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- ‘आम्ही दोघं सोबत होतो मात्र…’, म्हणत सायरा बानो यांनी व्यक्त केले दिलीप कुमार यांच्या निधनाचे दुःख
- असा आहे आलियाच्या ‘भट्ट’ परिवाराचा इतिहास, पहिल्या पिढीपासूनच आहे चित्रपट जगतात मोठे योगदान
- ‘मी आयुष्यात खुप काही भोगलंय’, हेमांगीने ट्रोलिंगवर लिहिली भली मोठी पोस्ट; वाचल्यावर तुम्हीही स्तब्ध व्हाल