Saturday, September 30, 2023

राखी सावंतने नवीन नवऱ्यासाठी डाेक्यावर फाेडली अंडी, युजर्सने कमेंट करत उडवली अभिनेत्रीची खिल्ली

‘ड्रामाक्वीन’ राखी सावंत तिच्या पतीपासून विभक्त झाल्यामुळे गेल्या काही दिवासांपासून चांगलीच चर्चेत आहे. आदिलसाेबत गुपचुप लग्न करण्यापासून ते त्याच्या विषयी पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल करेपर्यंत राखी सावंत सतत साेशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत हाेती. अशात आता राखी सावंतला तिच्या आयुष्यात पुढे जायचे आहे. तिला फक्त आदिलमध्ये अडकून राहायचे नाही. दरम्याान राखीचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर चांगलाच व्हायरल हाेत आहे, ज्यामुळे राखी चांगलीच चर्चेत आली आहे. काय आहे नेमके व्हिडिओमध्ये? चला, जाणून घेऊया…

‘ड्रामाक्वीन’ राखीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाेरदार व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये ती जिमचा ड्रेस परिधान करुन  दिसत आहे. मात्र, यावेळी राखीच्या हातात काही अंडी आहेत, जे राखी तिच्या डोक्यावर एक एक करून फोडताना दिसत आहे. यादरम्यान राखी म्हणताना दिसत आहे की, ‘चांगला नवरा भेटू दे, मला चांगला नवरा भेटू दे’ हे सांगताना राखी हातात ठेवलेली सर्व अंडी डोक्यावर फोडताना दिसत आहे.

आता नवरा मिळायसाठी हा उपाय राखीला कोणी सांगितली, हे मला माहीत नाही. मात्र, राखीच्या या व्हिडीओने तिच्या चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. या व्हिडिओवर अनेक जण भन्नाट कमेंट करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखीला डाेक्यावर अंडू फाेडताना पाहून अनेक युजर्स पाेटधरून हसत आहे. अशात एका युजरने म्हटले, ‘ती पुनीत सुपरस्टारची बहीण आहे.’, तर एका युजरने लिहिले, ‘आता आणखी किती नवऱ्यांची गरज आहे, मग तु त्याला तुरुंगात टाक’. अशात एका युजरने लिहिले, ‘आणि मग तुम्ही पुन्हा घटस्फोटाची पार्टी द्या आणि आम्हाला नाचून त्रास द्या. (tv actress rakhi sawant urge again for a groom social drama queen prayer for a soul mate broke eggs on head )

अधिक वाचा-
कपूर खानदानाचा ‘तो’ नियम मोडण्यासाठी नीतू यांना लागली होती 26 वर्षे, 21व्या वयात थाटलेला संसार
अमिताभ बच्चन यांनी ट्राेलर्सबाबत व्यक्त केलं मत; म्हणाले, ‘आता लोक मला गरीब अन् निर्बुद्ध…’

हे देखील वाचा