Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

नवऱ्याच्या घरी पोहोचताच राखीला बसला धक्का; म्हणाली, ‘आदिल झोपडपट्टीत…’

टीव्ही इंडस्ट्रीची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतच्या आयुष्यात सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. सुरुवातीला राखीचा पती आदिल खान दुर्रानी याने तिच्याशी लग्न केल्याचा नकार दिला हाेता, तर नंतर त्याने लग्नाची बाब मान्य केली. अशात काही दिवसांपुर्वी राखीने पती आदिलवर पैसे घेणे, मारहाण करणे असे अनेक गंभीर आरोप केले हाेते. ज्यानंतर राखी आता म्हैसूर येथे आदिलच्या घरी पोहोचली. यादरम्यान तिच्यसमोर जे सत्य आले ते पाहून तिचे डाेळे पाणावले. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

या सगळ्या गदारोळात राखी (rakhi sawant) जेव्हा म्हैसूरमध्ये आदिलच्या घरी पोहोचली, तेव्हा तिच्या समाेर जे सत्य आलं ते धक्कादायक होतं. सासरच्या घरी गेल्यावर राखी सावंतने सांगितले की, “आदिल कोणत्याही शोरूमचा मालक नाही.” यानंतर अभिनेत्रीने व्हिडिओमध्ये रडत रडत सांगितले की, “म्हैसूरला पोहोचल्यानंतर मला सत्य समजले की, आदिल एक ड्रायव्हर आहे आणि तो झोपडपट्टीत राहतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

या व्हिडीओमध्ये राखी सांगितले की, “ताे काेणत्या अब्बासचा ड्रायव्हर आहे,” जे तिला माहित नव्हते. राखीने असेही म्हटले आहे की, “तिला गरीबीपासून अडचण नाही तर, तिला त्याच्या खाेटारडेपणाची अडचण आहे.” व्हिडीओमध्ये राखी म्हणतेय, “आदिलने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. अरे देवा, तू कुठे आहेस?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Waahiid Ali Khan (@waahiidalikhan)

राखीच्या तक्रारीनंतर आदिलावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यानंतर त्याला म्हैसूरच्या पाेलीस काेठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणामुळे राखीही म्हैसूरमध्ये आहे. विशेष म्हणजे राखीने दिलेल्या माहितीनुसार, तिने मे 2022 मध्ये आदिलसोबत लग्न केले होते.(TV actress rakhi sawant was shocked as soon as she reached her husband house told adil is a driver lives in a slum )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
200 काेटींची फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर का रडला ढसा ढसा ? एकदा वाचाच
‘स्वत:बद्दल अभिमान बाळगायला हवा…’ म्हणत तेजश्री प्रधानाने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

हे देखील वाचा