Wednesday, July 3, 2024

‘खेड्यातील जीवन, शेतातील खाद्यपदार्थ अन्…’, रुबिना दिलॆकचा देसी अंदाज एकदा पाहाच

बिग बॉस 14‘ ची विजेती रुबिना दिलीक सध्या तिच्या गावी पोहोचली आहे. रुबिना हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाची रहिवासी आहे. ती जेव्हाही तिच्या घरी जाते, तेव्हा ती अनेकदा तिच्या गावातील फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते. अशात अलीकडेच तिची बहीण ज्योतिका दिलीकने व्हिडिओ क्रियटर रजत शर्मासोबत लग्न केले. लग्नात सहभागी होण्यासाठी रुबिना पती अभिनव शुक्लासोबत पोहोचली होती. अशात नुकतेच रुबिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गावात कशी दिवस घालवत आहे हे दाखवत आहे.

रुबिना दिलीक (rubina dilaik) हिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती दऱ्या-खोऱ्यांमध्ये फिरताना दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्री पाळीव प्राण्यांच्या पिल्लांसाेबतही खेळत आहे, तर रुबिनाचा पती अभिनव शुक्ला हिमाचल मधील विशिष्ट जेवणाचा आनंद लुटताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

रुबिना दिलीक पतीसह कुटुंबातील इतर सदस्यांसोबत कार्पेटवर बसून जेवणाचा आनंद घेत आहे, तर दुपारच्या जेवणात ती हिमाचल प्रदेशचे पारंपारिक पदार्थ खाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे पाहता येते की, रुबीना हिमाचलचा पारंपारिक पोशाख परिधान करून, तिच्या बहिणींसोबत फिरताना आणि त्यांच्यासोबत मस्ती करताना देखील दिसत आहे.

याशिवाय, रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला शिमल्याच्या स्थानिक बाजारपेठेतील एका दुकानातून शेतातील ताज्या भाज्या खरेदी करतानाही दिसले. यानंतर रुबीना शेतातील ताजे वाटाणे आणि भाज्या खाताना दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

रुबिना दिलीकने फॅमिली फोटोसाठी अनेक पोज दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना तिने ‘एकदम शुद्ध’ असे लिहिले आहे, तर फाेटाे पोस्ट करत तिने लिहिले की, “हे माझे साधे श्रीमंत जीवन आहे…”(tv actress rubina dilaik staying at home town spending simple life in himachal pradesh with family shared video give sneak peak)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
कंगना रणौत इंडस्ट्रीतील कोणालाही तिच्या घरी बोलवू इच्छित नाही! अस का म्हणाली अभिनेत्री?
ब्रेकिंग! आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन, 60व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा