पती अभिनव शुक्लाच्या मांडीवर बसली रुबीना दिलैक, रोमँटिक फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा


अभिनेत्री रुबीना दिलैकला चाहते अनेक नावांनी ओळखतात. कोणी तिला ‘छोटी बहू’ म्हणतो, तर कोणी लेडी बॉस. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ विजेती रुबीना दिलैक सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच तिला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी फिरायला देखील आवडते. त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी ती कुठेही गेली, तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करायला विसरत नाही. रुबीनाने पती अभिनवसोबत लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे इंटरनेटवर या जोडीच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रुबीनाने मालदीवमध्ये पती अभिनव शुक्लासोबत घालवलेल्या प्रेमाने भरलेल्या क्षणांचा फोटो शेअर केला आहे.

टीव्ही शोमध्ये रुबीना सहसा पारंपारिक पोशाखात दिसली आहे, पण या फोटोत टीव्हीच्या सुसंस्कृत सुनेचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहते हैराण होतील. रुबीना अभिनव शुक्लाच्या मांडीवर अतिशय रोमँटिक मूडमध्ये बसल्याचे या फोटोत तुम्ही पाहू शकता. असे दिसते की, तिला हा क्षण मोकळेपणाने जगायचा आहे. स्विमिंग पूलजवळ बसलेल्या रुबीना अभिनवचा सुंदर फोटो कोणाचाही मूड रोमँटिक करू शकतो, त्यामुळेच चाहते या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

रुबीनाने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोत तिने अतिशय सुंदर टू-पीस परिधान केला आहे आणि तिने एक मोठी टोपी देखील घातली आहे. अभिनव नेहमीप्रमाणे खूप सुंदर दिसत आहे

सुमारे वर्षभरापूर्वी रुबीना आणि अभिनव मालदीवला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथून त्यांचे फोटोही पोस्ट केले होते. पोस्ट शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “रोज एक नवीन कथा बनते, एक नवीन अध्याय जोडला जातो.”

काही दिवसांपूर्वी रुबीनाही कुटुंबासह हिमाचल प्रदेशला गेली होती. तिथूनही तिने तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडले होते. रुबीनाने हिमाचलच्या खोऱ्यात अनेक इंस्टाग्राम रील्सही केल्या होत्या.

‘बिग बॉस १४’ची विजेती असलेल्या रुबीनाची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. जेव्हा हे जोडपे बिग बॉसमध्ये आले, तेव्हा असे बोलले जात होते की, त्यांचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या शोमध्ये दोघांचे नाते अधिक घट्ट झाले. सध्या रुबीना सध्या अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पूजा हेगडे मालदीवमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो शेअर करत म्हणाली, ‘एक सामान्य मुलगी…’

-‘मंजिल मंजिल’ चित्रपटाला ३७ वर्षे पूर्ण; डिंपलसोबत काम करण्यास कुणी तयार नसताना सनीने दिली होती साथ

-अभिनेता रोनित रॉयने सांगितले टीव्हीवर काम न करण्याचे कारण; म्हणाला, ‘माझ्याकडून छोट्या पडद्यावर…’


Latest Post

error: Content is protected !!