Sunday, May 19, 2024

खूपच भयंकर आजाराचा सामना करतेय प्रसिद्ध अभिनेत्री, कॅमेऱ्यासमोर आपबीती सांगताना रडली ढसाढसा

वादग्रस्त पण तितकाच प्रसिद्ध असलेला ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोमध्ये आतापर्यंत अनेकजण सहभागी झाले आहेत. यामधून काहीजणांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली आहेत. त्यापैकीच एक असलेली अभिनेत्री म्हणजे संभावना सेठ होय. संभावना सध्या भलतीच चर्चेत आहे. यामागील कारण आहे तिच्या सांधेदुखीचा त्रास. तिने स्वत: कॅमेऱ्यासमोर येत या आजारपणाचा खुलासा केला आहे. तिने तिच्या शारीरिक समस्यांबद्दल सांगत ट्रोलर्सलाही धारेवर धरले आहे.

अभिनेत्री संभावना सेठ (Sambhavna Seth) ही तिच्या वेदना सांगताना कॅमेऱ्यापुढेच रडायला लागली. तिने तिच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून हा भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. चाहतेही तिला हिम्मत कायम राखण्यास आणि चांगला उपचार घेण्याचा सल्ला देत आहेत.

संभावनाने सांगितले की, सध्या ती एका खतरनाक आजाराशी झुंज देत आहे. याला सांधेदुखी (Arthritis) म्हणून ओळखले जाते. संभावनाने तिचा एक व्हिडिओ शेअर करत, याबाबत माहिती दिली आहे. या व्हिडिओत ती भावूक झाली आहे. तसेच, तिने सांधेदुखीवर मोकळेपणाने चर्चा केली आहे. तिने सांगितले की, या आजारपणामुळे तिला चालण्या-फिरण्यात अडचण येत आहे. तिचे हात-पाय सुजले आहेत. तिला याचा त्रास आणि आखडल्यासारखे होत आहे. आपल्या आजारपणाबद्दल सांगताना ती कॅमेऱ्यापुढेच रडताना दिसत आहे.

इतकेच नाही, तर ती थंडीत राहू शकत नाहीये. तिला ठीक राहण्यासाठी नेहमी गरम तापमानाची गरज पडते. संभावनाने सांगितले की, तिला बर्‍याच वर्षांपूर्वी संधिवात झाला होता, जो कालांतराने औषधांनी बरा झाला होता. मात्र, पुन्हा एकदा त्यांना त्याची लक्षणे जाणवू लागली आहेत.

अनेक बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमात झळकलेली टीव्ही अभिनेत्री संभावनाने तिच्या प्रत्येक शारीरिक समस्यांवर मोकळेपणाने चर्चा केली. ती म्हणाली की, “मला कोणती ना कोणती चिंता सतावतेय. एक गोष्ट बरी होते, तेव्हा दुसरी नवीन येऊन ठेपते. मला माझ्या पतीसाठीही वाईट वाटते, ज्याला या सर्वांचा त्रास सहन करावा लागत आहे. मी नेहमी आजारी राहिल्याने त्यालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. मूल होण्याच्या प्रयत्नात तिने केलेल्या आयव्हीएफ प्रक्रियेमुळे सांधेदुखीचा त्रास सुरू झाला आहे.”

संभावनाच्या या व्हिडिओला आतापर्यंत १६ लाखांहून अधिक लोकांना पाहिले आहे. ९ हजार लोकांनी तिच्या या व्हिडिओवर कमेंट्स केल्या असून ते तिला खचून न जाता पुन्हा जोमाने उभी राहण्यासाठी प्रेरित करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यावर संतापला मराठी अभिनेता; थेट मुख्यमंत्र्यांनाच म्हणाला, ‘आमच्या हयातीत…’
रणवीरचे न्यूड फोटोशूट काढणारा फोटोग्राफर आहे तरी कोण? ३ तास दीपिकाच्या पतीला ठेवलं होतं उघडं
दिशा आणि टायगरचे नाते तुटले? अभिनेत्याच्या जवळच्या मित्रानेच सांगितले ब्रेकअपबद्दल खरं काय ते

हे देखील वाचा