‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘प्रतिज्ञा’ आणि ‘कृष्णदासी’ यांसारख्या टीव्ही मालिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री सना अमीन शेख सध्या जोरदार चर्चेत आहे. यामागील कारण तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. सनाने स्वत: खुलासा केला आहे की, तिने तिचा पती आणि दिग्दर्शक एजाज शेख याच्याशी घटस्फोट घेतला आहे. या जोडप्याने आपले 6 वर्षांचे नाते कायमचे संपवले आहे.
लग्नाच्या 6 वर्षांनंतर घेतला घटस्फोट
माध्यमांतील वृत्तांनुसार, अभिनेत्रीने सांगितले की, “एक महिना एकमेकांना जाणून घेतल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही एकमेकांना खूप आवडायचो. आमच्याकडे वेळ नव्हता. आमचे वेळापत्रक खूपच व्यस्त असायचे. त्यामुळे आम्हाला एकत्र वेळ घालवता येत नव्हता. आमच्यात सुसंगततेच्या समस्या होत्या.” अभिनेत्री सना आणि तिचा पती एजाज शेख (Aijaz Sheikh) या दोघांनीही त्यांचे लग्न वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु ते त्यांचे 6 वर्षांचे नाते टिकवू शकण्यात अपयशी ठरले.
View this post on Instagram
अनेकदा मिटवण्याचा केला प्रयत्न
अभिनेत्रीने पुढे बोलताना सांगितले की, “लग्नाच्या 6 वर्षांनंतर आम्ही वेगळे झालो. अनेकदा मिटवण्याचाही प्रयत्न केला. कारण, आम्हाला लग्न वाचवायचे होते. जेव्हा दोन व्यक्ती एका छताखाली खुश नसतात, तेव्हा वेगळे होणेच चांगले असते. जेव्हा आम्हाला वाटले की, आता यापासून वाचण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाहीये, तेव्हा आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही अधिकृतरीत्या वेगळे झालो आहोत.”
शोच्या सेटवर झाली होती दोघांची भेट
अभिनेत्री सना अमीन शेख आणि एजाज शेख यांची पहिली भेट ‘कैसी ये यारियां सिझन 2’ या शोच्या प्रमोशनल शूटदरम्यान झाली होती. त्यांच्यात आधी मैत्री झाली, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही 30 ऑगस्ट, 2015 मध्ये साखरपुडा केला होता. पुढे 14 जानेवारी, 2016 रोजी त्यांनी संसार थाटला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् आईच्या शुभेच्छा दुसरीकडं; रणबीरचे गोडवे गात म्हणाल्या, ‘शक्ती अस्त्र’










