टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी अशा स्टार किड्सपैकी एक आहे जी नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. पलक सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून कायमच चाहत्यांचे लक्ष वेधते. दरम्यान, तिचा एक नवीन व्हिडिओ इंटरनेटवर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे. या व्हिडीओमध्ये पलकच्या स्टाईलने चाहते थक्क झाले आहेत.
पलक तिवारी (palak tiwari) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पलकने लेहेंगा चोली घातलेली दिसत आहे. तिने गोल्डन कलरचा डीप नेक ब्लाउज कॅरी केला आहे, तर पांढऱ्या रंगाचा लेहेंगा घातला आहे, ज्यावर सुंदर नक्षी आहे. मात्र, यासोबत पलकने कोणताही स्कार्फ कॅरी न केल्याने ती या लूकमध्ये प्रचंड हाॅट दिसत आहे. दरम्यान पलकने केस मोकळे साेडले आहेत जे तिच्या साैंदर्यात चार चाॅंद लावत आहेत. पलकचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल हाेत असून चाहते तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
पलक तिवारी सध्या तिच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत असते. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या या चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 2023 च्या ईदला रिलीज होणार आहे. (tv actress shweta tiwari daughter palak tiwari wear designer bralette blouse and flaunts her cleavage latest video goes viral on social media)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांच्याशी भेट झाल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी ‘द एलिफेंट व्हिस्पर्स’बद्दल लिहिले…
संघर्षाच्या काळात ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीने ऑस्कर विजेत्या एमएम किरवानी यांच्या अल्बममध्ये केले होते डान्सर म्हणून काम