सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते श्वेता तिवारीची मुलगी; प्रशंसा करत आई म्हणाली…


ज्याप्रकारे बॉलिवूड अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात, त्याचप्रकारे टीव्ही अभिनेत्रीदेखील चर्चेत असतात. सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी होय. विशेष म्हणजे यावेळी चर्चा फक्त श्वेताची नाही, तर तिची लाडकी लेक पलक तिवारीचीही आहे. या मायलेकी सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतात. आईप्रमाणेच पलकही नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सौंदर्याच्या बाबतीत पलक ही बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देते, हे आम्ही नाही तर तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहून चाहते म्हणतात. श्वेताही आपल्या मुलीच्या सुंदरतेचे गुणगान गात असते. आताही तिने आपल्या मुलीचे कौतुक केले आहे. (TV Actress Shweta Tiwari Praise Her Daughter Palak Tiwari Called Her Diva)

नुकतेच श्वेताने पलकचा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या व्हिडिओत पलक टायगर प्रिंट असलेल्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ एखाद्या फोटोशूटचा असल्याचे समजते. व्हिडिओ शेअर करून श्वेताने लिहिले आहे की, “दीवा बनवली जात नाही, तर ती जन्माला येते.” पलकनेही हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

नुकतेच पलकने आपल्या फोटोशूटचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंनी इंंटरनेटवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. फोटोत ती वेगवेगळ्या अंदाजत पोझ देताना दिसत होती. काही वेळातच तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता.

पलक लवकरच बॉलिवूड पदार्पण करणार आहे. ती ‘रोजी- द सॅफ्रॉन चॅप्टर’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्राने केले आहे.

या चित्रपटाचे निर्माते विवेक ओबेरॉय, प्रेरणा वी अरोरा आहेत. या चित्रपटात पलकव्यतिरिक्त विवेक ओबेरॉय, मलायका शेरावत आणि अरबाज खानही झळकणार आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.