Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन तुनिषा शर्माचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अभिनेत्रीची आई झाली बेशुद्ध, वाचा लेटेस्ट अपडेट

तुनिषा शर्माचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अभिनेत्रीची आई झाली बेशुद्ध, वाचा लेटेस्ट अपडेट

20 वर्षांय तुनिषाला कुटुंब आणि मित्रांनी कायमचे गमावले आहे. अभिनेत्रीच्या अशा या जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. तुनिषा असे करू शकते यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. 24 डिसेंबर रोजी दुपारी तुनिषा शर्माचा मृतदेह तिच्या शोच्या सेटवर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी अभिनेत्रीचा प्रियकर आणि सहअभिनेता शीजान खानला अटक केली आहे. शीजानवर तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

अभिनेत्री तुनिषा शर्मा (tunisha sharma) हिचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी तिची आई बेशुद्ध झाली, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by TAHIR JASUS007 (@tahirjasus)

तुनिषाचा मृतदेह स्मशानभूमीत पोहोचला आहे. रडत रडत अभिनेत्रीच्या आईची प्रकृती बिघडली आहे. इतक्या लहान वयात आपल्या मुलीला असं जाताना पाहून तिला स्वतःला सांभाळता येत नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

टीव्ही इंडस्ट्रीची फेम अभिनेत्री दीपिका सिंह तिच्या पतीसोबत तुनिषाच्या अंतिम दर्शनाला पोहोचली. त्यासाेबतच टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री अश्नूर कौर तुनिषाच्या घरी पोहोचली आणि तिला श्रद्धांजली वाहिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

दरम्यान, आता तुनिषा शर्माचा आज (दि. 27 डिसेंबर)ला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीचे अंतिम संस्कार गोडादेव नाका येथील स्मशानभूमीत होणार आहेत. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची बातमी दिली आहे. कुटुंबीयांनी लिहिले की, “अत्यंत जड अंतःकरणाने तुनिषा 24 डिसेंबर रोजी आम्हाला सोडून गेली. सर्वांनी यावे आणि दिवंगत आत्म्यासाठी प्रार्थना करावी ही विनंती. 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता गाेडादेव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात मृत्यूनंतर दोन दिवसांनी अभिनेता शीजान खानच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की,” जे लोक निवेदनासाठी आमच्याशी संपर्क साधत आहेत, त्या लोकांसाठी हा संदेश आहे की, कृपया आम्हाला आणि आमच्या कुटुंबाला थोडा वेळ द्या. .. आम्हाला थोडी गोपनीयता हवी आहे. मीडियाचे सदस्य सतत आम्हाला कॉल करत आहेत, अगदी आमच्या घराखाली टक लावून पाहत आहेत हे पाहून वाईट वाटते.” असे शीजानच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.

तुनिषा शर्माची आई वनिता शर्मा यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर शीजनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुनिषासोबत रिलेशनशिपमध्ये असताना शीजानचे इतर मुलींसोबत संबंध होते, असे सांगत त्यांनी व्हिडिओ जारी केला आहे. पुढे, शीजनने आपल्या मुलीचा वापर केल्याचेही म्हटले आहे.

तुनिषा शर्मा 4 जानेवारीला 21 वर्षांची झाली असती, पण वाढदिवसापूर्वी तिने आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी तिने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. महाराणा प्रताप या मालिकेद्वारे तिने टीव्हीवर पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत ती अनेक लोकप्रिय शोचा भाग हाेती.(tv actress tunisha sharma death the last rites of actress tunisha sharma will be held this afternoon)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! सेटवरच ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत ढासाळली, नाकातून रक्तस्त्राव अन्…

लेकीचा अखेरचा चेहरा पाहून कोलमडली तुनिषा शर्माची आई, पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा