Friday, April 26, 2024

धक्कादायक! सेटवरच ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत ढासाळली, नाकातून रक्तस्त्राव अन्…

बिग बॉस 13‘ पासून प्रसिद्ध झोतात आलेली पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिच्यासंबंधीत नुकतंच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिमांशी नवीन चित्रपटाच्या शुटींगवेळी अचानक तिची तब्येत खालावली आहे. आभिनेत्रीला पूर्वीच ताप आला होता मात्र, तरीही ती शुटिंगला गेली आणि अचान तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला त्यामुळे तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंजाबी चित्रपट आणि गाण्यामध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिच्या नवीन पंजाबी चित्रपटाची शुटींग रोमेनियामध्ये सुरु होती. त्यावेळी तिथले थंडीचे तापमान 7 डिग्री सेल्सिअस झाले होते. हिमांशीला शुटिंगपूर्वीच ताप आला होता मात्र, तरीही ती शुटींगला गेली. त्यामुळे तिची तब्येत अजूनच बिघडली आणि तिच्या नाकातून रक्तस्त्रावही होऊ लाग त्यामुळे अभिनेत्रीला लगेचच रुग्णालयात दाखल केले गेले.

हिमांशी सध्या ‘फत्ते दे यार बडे ने यार’ या पंजाबी चित्रपटाच्या शुटिंगसाठी रोमेनियामध्ये गेली आहे. या चित्रपटामध्ये हिमांशी मुख्य भमिकेत पाहायला मिळणार आहे त्याशिवाय तिच्यासोबत इंदर चहल (Indar Chagal), निशा बानू (Nisha Banu) यांच्याही भूमिका आहेत. माध्यनमातील वृत्तानुसार हिमांशीची आधीच तब्येत ठीक नव्हती आणि तिला तापही आला होता मात्र, तरीही ती शुटिंगला गेली. त्यावेळी तिला चित्रपटाच्या एका सीनसाठी थंड पाण्यात शूट करायचं होतं, पण अचानकच तिची तब्येत खूपच बिघडली शिवाय तिच्या नाकातून रक्तस्त्रावही होऊ लागला त्यामुळे अभिनेत्रीसाठी लगेच रुग्णालय गाठले.

वृत्तातील दिलेल्या माहितीनुसार सध्या अभिनेत्रीवर उपचार सुरु आहेत, त्याशिवया तिला डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. हिमांशीच्या तब्येतबाबत कोणतीही माहिती नसल्यामुळे अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ  शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने थांडीपासून बाचावसाठी अनेक कपडे परिधान केलेलं दिसून येत आहे. त्याशिवाय तिने ‘थंडी खूप आहे पण शूट करावे लागेल,’ असं कॅप्शनही दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

काही दिवसांपूर्वी हिमांशीने सांगितले होते की, ती मानसिक आजाराशी झुंज देत आहे. बिग बॉसमधील घरातील नकारात्मक वातावरणामुळे ती घरातून बाहेर आल्यानंतर जवळपास ती 2 वर्ष डिप्रेशनच्या आधीन गेली होती. त्याशिवाय तिला कधी कधी पॅनीक अटॅकही येत होते. त्यामुळे तिला उपचारही घ्यावे लागले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आजच्या पिढीला हे काय झालंय?’ तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर काम्या पंजाबीने व्यक्त केली खंत
सुशांत सिगं राजपूत आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टम कर्मचाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य

हे देखील वाचा