Friday, April 25, 2025
Home टेलिव्हिजन आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा पाेस्टमार्टम रिपाेर्ट आला समाेर, डाॅक्टरांकडून धक्कादायक खुलासा

आत्म’हत्या करणाऱ्या अभिनेत्रीचा पाेस्टमार्टम रिपाेर्ट आला समाेर, डाॅक्टरांकडून धक्कादायक खुलासा

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या अचानक आत्महत्येमुळे संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त करत छोट्या पडद्यावरील अनेक स्टार्सनी तिला श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान, तुनिषाचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. अभिनेत्रीचे पोस्टमॉर्टम जेजे हॉस्पिटलमध्ये झाले, ज्याच्या रिपोर्टमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, पोलिसांनी या अफवा तूर्तास फेटाळून लावल्या आहेत.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, 20 वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्मा हिचा (tunisha sharma) मृत्यू गुदमरल्यामुळे झाला. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. शनिवारी (दि. 24 डिसेंबर)ला तुनिषाने अलिबाबा या टीव्ही शोच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिषाने तिचा को-स्टार शीजान मोहम्मद खानच्या मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला. यानंतर रात्री उशिरा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. चार-पाच डॉक्टरांच्या उपस्थितीत अभिनेत्रीचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. यादरम्यान त्याची व्हिडिओग्राफीही करण्यात आली.

तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर तिच्या आईने शीजानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या आईच्या म्हणण्यानुसार, शीजनच्या चिथावणीमुळेच तिच्या मुलीने असे पाऊल उचलले. तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून शीजनविरुद्ध कलम 306 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रात्री उशिरा चौकशीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या हा अभिनेता चार दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंग’, ‘दबंग 3’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कॅटरीना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली हाेती.(tv actress tunisha sharma suicide case postmortem report says actress died due to suffocation)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेत्री जयसुधानं मांडली दु:खद व्यथा; म्हणाली, ‘कंगना रणाैतला पद्मश्री अन् आमच्याकडे दुर्लक्ष…’

तुनिषाच्या टॅटूची साेशल मीडियावर चर्चा; हातावर लिहिला हाेता ‘हा’ खास संदेश

हे देखील वाचा