Thursday, November 30, 2023

तुनिषाच्या टॅटूची साेशल मीडियावर चर्चा; हातावर लिहिला हाेता ‘हा’ खास संदेश

सोनी सब टीव्हीवरील मालिका ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल‘ची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. या प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. तुनिषा 20 वर्षांची होती. तुनिषाने तिच्या करिअरची सुरुवात इंडस्ट्रीमध्ये बालकलाकार म्हणून केली होती. तनुषासाठी प्रेम ही तिची आवड होती आणि हेच तिला आयुष्यात पुढे नेत होते, मग अचानक एक अप्रिय घटना घडली आणि तिने हे जग सोडले.

अभिनेत्री तुनिषा शर्मा (tunisha sharma) हिचा साेशल मीडियावर खूप माेठा चाहतावर्ग आहे. ती साेशल मीडियावर नियमित सक्रिय असून तिचे फाेटाे आणि व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर करत असे. अशातच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री मनगटावर प्रेमाशी संबधीत संदेश गोंदवताना दिसत आहे.

तुनिषाने तिच्या मनगटावर लिहिले आहे की, “प्रेम सर्वांपेक्षा वर आहे.” व्हिडिओसोबतच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की, तिला प्रेमाच्या नावावर खूप दिवसांपासून टॅटू गोंदवायचा होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “बकेट लिस्ट, आफ्टर ऑल मी गोंदवले. खूप खूप धन्यवाद. मला ते खूप आवडले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाच्या आत्म’हत्या प्रकरणी पोलीस या घटनेचा तपास घेत आहेत. तुनिषाच्या जवळच्या मित्रांनी तिचा को-स्टार शीजान खानवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी त्याला 4 दिवसांसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे होऊ शकतात. अशी आशा वर्तवली जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, “ब्रेकअप हे तिच्या आत्महत्येचे कारण आहे.”

तुनिषा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंग’, ‘दबंग 3’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कॅटरीना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली हाेती.(tv actress ali baba dastaane kabul tunisha sharma showing hand tattoo with love message written watch video)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्ट अन् रणबीर कपूरने कुटुंबासोबत साजरा केला ख्रिसमस, पाहा व्हायरल फाेटाे

ब्रेंकिग! दाक्षिणात्य दिग्गज अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाविश्वावर शाेककळा

हे देखील वाचा