Friday, April 26, 2024

तुनिषा शर्मा आत्माहत्या प्रकरणात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला अटक

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवावर (दि, 24 डिसेंबर) रोजी शिटिंगच्या सेटवर आपला को-स्टार शीजान खान याच्या खोलीमध्ये तिने गळफास घेऊन आत्माहत्या केली. तिच्या आत्माहत्येच्या बातमीने अनेक कलारांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूनंतर अनेक मोठे खुलासे होत असून तिचा को स्टार खोलीमध्ये हे कप्ररण घडल्यामुळे शीजानला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्महत्या प्रकरणी माध्यामातील वृत्तानुसार वालिव पोलिसांनी तिचा को-स्टार शीजान खान (Shijan Khan) याच्यावर तुनिषाला आत्माहत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या आरोपानुसार त्याला अटक केली आहे. पोलिसांनी कलम 306 नुसार तक्रार नोंदवली आहे. आज (दि, 25 डिसेंबर) रोजी अभिनेत्याला न्यायालयात अज हजर केलं जाइल.

तुनिषाने आत्माहत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ देखिल शेअर केला होता. यानंतर तिने आत्माहत्या केली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना दरवाजा तोडल्यावर तुनिषाने प्राण सोडले होते, त्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना कोणत्याच प्रकारची चिठ्ठी मिळाली नाही. अद्याप आत्माहत्येचे कारणही स्पष्ट झाले नाही. पोलिसांच्या मते अभिनेत्रीच्या मृत्यूची आत्माहत्या आणि हत्या या दोन्ही बाजूंनी तपासनी केली जाइल.

 

View this post on Instagram

 

तुनिषा शर्मा हिने आपल्या करिअरची सुरुवात ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’ या मालिकेतून केली होती. यानंतर तिने ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘शेर ए पंजाब’, ‘महाराजा रणजीत सिंग’ आणि दबंग 3 मध्येही काम केले होते. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंग’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कॅटरीना कैफची भूमिका साकारली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली हाेती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
डिप्रेशनमध्ये होती अभिनेत्री! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासाेबत 15 दिवस आधी झाले हाेतं ब्रेकअप, वाचा संपूर्ण किस्सा
खळबळजनक! 20 वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा होती प्रग्नेंट?

हे देखील वाचा