Friday, December 1, 2023

‘काेई मिल गया’चा जादू आला परत, काेण आहे ही अभिनेत्री? ओळखा पाहू

उर्फी जावेदला प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे हे माहित आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. कधी ती सॉफ्ट टॉईज असलेले आउटफिट घातलेली दिसते, तर कधी ती सेफ्टी पिनने बनवलेल्या ड्रेसमध्ये दिसते. उर्फीचा स्वतःवर खूप विश्वास आहे आणि जग तिच्याबद्दल काय विचार करते याची तिला अजिबात पर्वा नाही. उर्फीच्या निम्म्या लूकवर साेशल मीडिया युजर्स तिला ट्राेल करतात, पण तिला त्याचे वाईट वाटत नाही आणि ती नियमिच विविध स्टाईल करून पाहते.

उर्फी (uorfi javed ) पुन्हा एकदा तिच्या आउटफिटमुळे चर्चेत आली आहे. खरे तर गुरुवारी (9 जुन)ला उर्फी पुन्हा एकदा स्पाॅट झाली. अशात यावेळी अभिनेत्रीने निळ्या रंगाच्या ओव्हरऑल गाऊन परिधान केला हाेता. या आऊटफिटमध्ये उर्फीचे फक्त डोळे आणि ओठ दिसत होते. अशात उर्फी कारमधून उतरताच तिने मीडियाला पाेज दिली.

अशात हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे आणि साेशल मीडिया युजर्स यावर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.  एक युजरने कमेंट करत लिहिले की, ‘दीदींनी कोविड सूट परत घातला आहे’, तर आणखी एका युजरने तिची तुलना शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राशी करत लिहिले की, ‘राज कुंद्राची बहीण दिसत आहे.’ उर्फीचे कपडे पाहून काही युजरने तिला ‘कोई मिल गया’ चा ‘जादू’ही म्हणत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या बिग बॉस ओटीटी या रिअॅलिटी शोमधून मिळाली. (Tv actress uorfi javed new mask look gets viral people started trolling )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानचे पनवेल फार्महाऊस, जिथे पार्टीही हाेते अन् शेतीही; पाहा 150 एकरात परसले स्वर्ग

अर्जुन बिजलानीच्या नवीन शोचा दमदार ट्रेलर रिलीज, ‘या’ अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार अभिनेता

हे देखील वाचा